पुणे : राज्यात १ आॅगस्टपर्यंत पावसाचा जोर कमीच राहील. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक पावसाच्या सरी कोसळतील, तर मराठवाड्यात काहीच ठिकाणी पावसाचा शिडकावा होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.भारतीय हवामान खात्याच्या कृषी हवामान प्रभागाने २८ जुलै ते १ आॅगस्टदरम्यानचा हवामान अंदाज शुक्रवारी जाहीर केला. कोकणात पुढील ५ दिवसांत बहुतेक ठिकाणी पाऊस पडेल; मात्र त्याचा जोर कमी राहील. मध्य महाराष्ट्रात तुरळक आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस होईल. मराठवाड्यात मात्र अल्प स्वरूपात पाऊस पडेल. पुण्यात येत्या २ आॅगस्टपर्यंत पावसाची एखाद दुसरी सर कोसळेल, असे वेधशाळेकडून सांगण्यात आले.विदर्भातील देवरी, एटापल्ली आणि साकोली येथे १० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. घाटमाथ्यावरील शिरगाव ४०, वाणगाव, अंबोणे ३०, दावडी, कोयना, ताम्हिणी प्रत्येकी २०, शिरोटा, ठाकूरवाडी, वळवण, डुंगरवाडी आणि खंद येथे १० मिलिमीटर पाऊस झाला.शुक्रवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत मध्य महाराष्ट्रात लोहगाव येथे ०.५, कोल्हापूर १, महाबळेश्वर ९, नाशिक ०.७, सांगली २, सातारा येथे ३ मिमी. पाऊस झाला. कोकणात रत्नागिरीला ०.४, सांताक्रूझ ०.२, विदर्भात अमरावती, गोंदिया १, नागपूर २ आणि यवतमाळ येथे ५ मिलिमीटर पाऊस झाला.शुक्रवारी सकाळी साडेआठपर्यंत कोकणातील चिपळूण ३०, खेड २०, अंबरनाथ, भिरा, कानकोन, दाभोली, दापोली, हर्णे, कणकवली, म्हापसा, माथेरान, राजापूर, सावंतवाडी, वैभववाडीत १० मिमी. पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वर ३०, इगतपुरी, राधानगरी येथे प्रत्येकी २०, अजरा, आंबेगाव, घोडेगाव, चंदगड, मुल्हेर, पाटण, वळवा येथे प्रत्येकी १० मिलिमीटर पाऊस पडला.
पाच दिवस तुरळक सरींचे; हवामान विभागाचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 2:46 AM