शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

किडनी प्रकरणातील पाचही डॉक्टरांना जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2016 1:24 AM

हिरानंदानी किडनी रॅकेट प्रकरणी अंधेरी दंडाधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह पाचही डॉक्टरांची जामिनावर सुटका केली. या पाचही डॉक्टरांनी १३ आॅगस्ट रोजी

मुंबई : हिरानंदानी किडनी रॅकेट प्रकरणी अंधेरी दंडाधिकाऱ्यांनी रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह पाचही डॉक्टरांची जामिनावर सुटका केली. या पाचही डॉक्टरांनी १३ आॅगस्ट रोजी जामिनासाठी दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. दंडाधिकाऱ्यांनी मंगळवारी हिरानंदानी रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. सुजी चॅटर्जी, अनुराग नाईक, मुकेश शेट्टे, मुकेश शहा आणि प्रकाशचंद्र शेट्ट्ये या पाचही जणांच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. गुरुवारी दंडाधिकाऱ्यांनी या सर्व डॉक्टरांची सशर्त जामिनावर सुटका केली. त्यांना २६ सप्टेंबरपर्यंत पवई पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे व देश सोडून न जाण्याचे आदेश न्यायालयाने दिले.‘या सर्व डॉक्टरांवर आयपीसी अंतर्गत गुन्हा नोंदवलेला नसून मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील तीन जणांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. या डॉक्टरांची या गुन्ह्यात काहीही भूमिका नसताना त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी किडनीदान केल्याबद्दल दात्याला दिलेले पैसेही ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे या सर्व डॉक्टरांची जामिनावर सुटका करावी,’ अशी विनंती डॉक्टरांतर्फे अ‍ॅड. आबाद पौडा यांनी न्यायालयाला केली. अ‍ॅड. पौडा यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने या पाचही डॉक्टरांची जामिनावर सुटका केली. हिरानंदानी रुग्णालयात १४ जुलै रोजी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात येणार असून हे किडनीदाता आणि रुग्ण हे एकमेकांचे नातेवाईक नाहीत, अशी माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी १४ जुलै रोजी ऐनवळी रुग्णालयावर धाड टाकली. ब्रिजकिशोर जैसवाल याची शस्त्रक्रिया थांबवण्यात आली. किडनी देणारी महिला त्याची पत्नी नसल्याचे निदर्शनास आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महिला केवळ आर्थिक फायद्यासाठी जैसवाल याला किडनी देण्यास तयार झाली होती. (प्रतिनिधी)