ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. १७ : ऊसाचे बिल मिळत नसल्याकारणाने सोलापूर जिल्ह्यातील पाच शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास चक्क सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातच अंगावर रॉकेल ओतुन पेटवून घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला़ या घटनेवेळी पोलीसांच्या सतर्कतेमुळे जिवितहानी टळली़
विजय शुगर साखर कारखान्याकडून एफआरपीची रक्कम न मिळाल्याने उंदरगांव (ता़ माढा) येथील पाच शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर रॉकेल ओतुन पेटवून घेण्याचा प्रयत्न केला़ यावेळी पोलीसांच्या सतर्कतेमुळे जिवितहानी झाली नाही़ यात चार शेतकरी जखमी झाले आहेत़.
या घटनेनंतर जिल्हाधिकारी परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता़ शासकीय कामांसाठी आलेल्या नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती़ यातील जखमींना शासकीय रूग्णालयात उपचार केले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे़ आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पाचही शेतकऱ्यांना सदर बझार स्टेशनच्या पोलीसांनी ताब्यात घेतले आहे़