येणेगूर (जि. उस्मानाबाद) : सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील येणेगूर गावानजीक शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास महाराष्ट्र व कर्नाटक महामंडळाच्या बसची समोरासमोर धडक होऊन पाच जणांचा जागीच मृत्यू तर, अन्य २६ जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन्ही बसच्या चालकांचा समावेश आहे.इंदापूर (जि. पुणे) आगाराची उमरगा-पुणे ही बस आणि कर्नाटकातील आळंद आगाराची तुळजापूर-गाणगापूर बस यांची समोरासमोर जोराची धडक बसली. लक्ष्मण दत्तात्रय म्हेत्रे (३४, उमरगा-पुणे बसचे चालक), प्रवासी वामन मारुती साळुंके (४३) व शिवाजी मारुती साळुंके (४०), राहुल रमाकांत कटारे (३१) आणि आंबराया शिवराया तेलाकुने (३४, तुळजापूर-गाणगापूर बसचे चालक) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात २६ जखमी झाले. त्यापैकी चार जखमींवर जळकोट, एकावर उमरगा तर इतर जखमींना उपचारासाठी सोलापूरला हलवले आहे. (प्रतिनिधी)
दोन बसच्या धडकेत पाच ठार
By admin | Published: December 24, 2016 4:24 AM