सुरेश भटेवरा, नवी दिल्लीजेटलींच्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी खास कोणतीही विशेष तरतूद नाही. देशाला जे मिळाले, त्यात राज्याला आपला वाटा मिळेल. रस्ते, रेल्वे, वीज आणि खत पुरवठा ही खाती नितीन गडकरी, सुरेश प्रभू, पियुष गोयल, स्मृती इराणी, हंसराज अहिर या महाराष्ट्रातील मंत्र्यांकडे आहे. त्यामुळे ते मंी आपल्या खात्यांतून राज्याला काय मिळवून देतात, हे पाहायचे. रस्ते आणि राष्ट्रीय महामार्गांचा विस्तार करण्यासाठी ९७ हजार कोटींची, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेसाठी १९ हजार कोटींची तर रेल्वेचे नेटवर्क वाढवण्यासाठी १ लाख २ हजार कोटींची अशी तब्बल २ लाख १८ हजार कोटींची तरतूद आहे. वर्षभरात १0 हजार किलोमीटर्सचे नवे रस्ते निर्माण करण्याचे आव्हान गडकरींच्या मंत्रालयाने स्वीकारले आहे. राष्ट्रीय महामार्गांसाठी ५५ हजार कोटींची तरतूद आहे. कंत्राटदारांच्या वादामुळे रखडलेले ८५ टक्के महामार्गांच्या कामातील अडथळे गडकरी यांनी दूर केले आहेत. खाजगी वाहतूक कंत्राटदारांना प्रवासी मार्गांवर प्रोत्साहन देण्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्यासाठी कायद्यात सुधारणा होणार आहेत. गडकरींनीच्या या संकल्पनांचे संचालन त्यांचे खातेच करणार आहे.
महाराष्ट्राची भिस्त पाच मंत्र्यांवर!
By admin | Published: March 01, 2016 3:30 AM