शहरं
Join us  
Trending Stories
1
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
2
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
3
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला
4
'पुतण्याचा कौटुंबिक विषय कायमचा संपला' म्हणत आमदार बबनराव शिंदेंची महायुतीला सोडचिठ्ठी
5
हरयाणात भाजपची हॅट् ट्रिक की, काँग्रेसचे होणार पुनरागमन? मतदानाला सुरुवात
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सार्वजनिक क्षेत्रातून प्रशंसा, कौटुंबिक व दांपत्य जीवनात सौख्य लाभेल
7
मंत्रालयात आमदारांच्या जाळीवर उड्या; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळांसह आदिवासी आमदारांचा संताप
8
नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर दगडफेक; पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी, मोठं नुकसान
9
पुण्यात मित्राला झाडाला बांधून तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन नराधमांचा शाेध सुरू
10
राज्यातील अकृषक कर पूर्ण माफ; सरकारचा निर्णयांचा धडाका सुरूच, मंत्रिमंडळ बैठकीत ३३ निर्णय 
11
हावभाव बघूनच एकमेकींना समजून घेतो; शेफालीने सांगितले स्मृतीसोबतच्या ताळमेळीचे रहस्य
12
हार्दिकची १८ कोटींची  पात्रता आहे का? : मूडी
13
राज्यात आज धडाडणार राजकीय तोफा; मोदी वाशिम-ठाण्यात तर राहुल गांधी कोल्हापुरात
14
भारताचा दारुण पराभव, न्यूझीलंडची विजयी सलामी
15
धारावी प्रकल्पातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात समिती; न्या. दिलीप भोसले अध्यक्ष, सहा सदस्यही नेमले
16
समाज घटकांसाठी महामंडळे; मंत्रिमंडळ बैठकीत जैन, बारी, तेली समाजासाठी महत्त्वाचे निर्णय 
17
पंतप्रधानांच्या डोळ्यात धूळफेक, अपूर्ण योजनेचे उद्घाटन
18
एकीकडे इराण म्हणतोय युद्ध नकोय, दुसरीकडे म्हणतोय इस्रायलवर हल्ले करणारच 
19
मोदींचे ठरले! ९ वर्षांनी पाकच्या दौऱ्यावर जाणार भारताचे परराष्ट्रमंत्री; ‘एससीओ’ परिषदेत हाेणार सहभागी
20
निवडणुकीचे सूर उमटले वाद्यांच्या बाजारात; उलाढाल वाढली, राज्यातील उमेदवारांची खरेदीसाठी धाव 

कोकण रेल्वे मार्गात पाच नवीन प्रकल्प

By admin | Published: April 08, 2017 3:35 AM

केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने कोकण रेल्वेच्या अधिकृत शेअर समभाग (कर्जरोखे) भांडवलामध्ये ८०६.४७ कोटी रुपयांवरून ४,०००कोटी रुपये इतकी वाढ करण्यास मंजुरी दिली

नवी मुंबई : केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने कोकण रेल्वेच्या अधिकृत शेअर समभाग (कर्जरोखे) भांडवलामध्ये ८०६.४७ कोटी रुपयांवरून ४,०००कोटी रुपये इतकी वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. कोकण रेल्वेतर्फे १०,००० कोटी रु पये खर्चाचे पाच प्रकल्प उभारण्यात येत आहेत. या प्रकल्पांमध्ये रोहा-वीर मार्गाचे दुपदरीकरण, कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण, कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासी क्षमतेचे दुपटीकरण, चिपळूण-कराड रेल्वे मार्ग उभारणी आणि नवीन क्रॉसिंग स्टेशनांची निर्मिती या प्रकल्पांचा समावेश आहे. हे प्रकल्प येत्या पाच वर्षांत पूर्ण होणार आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिले.रोहा-वीर मार्गाचे दुपदरीकरण करण्याचे काम सुरू झाले असून, या कामासाठी ३४० कोटी रु पये खर्च येणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना सोयी-सुविधा उपलब्ध करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासन कटिबद्ध असून, कोकण रेल्वेमार्गावरील रेल्वे रु ळांची वाढ करण्याबरोबरच रेल्वेमार्गावर नवीन ११ रेल्वे स्थानके उभारण्यात येत आहेत. त्यापैकी नऊ रेल्वे स्टेशन महाराष्ट्र राज्यात, तर दोन कर्नाटक राज्यात उभारण्यात येणार आहेत. कोकण रेल्वेतर्फे ३२०कोटी रु पये खर्चून चिपळूण-कराड रेल्वेमार्ग उभारण्यात येत आहे. कोकण रेल्वेमध्ये केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचा ५१ टक्के, महाराष्ट्र सरकारचा २१टक्के, कर्नाटक सरकारचा १६टक्के, गोवा आणि केरळ सरकारचा प्रत्येकी ६ टक्के वाटा आहे, असे गुप्ता यांनी सांगितले. १९९० पासून कोकण रेल्वेतर्फे रोहा ते बंगळुरू (मंगलुरू) या दरम्यानच्या ७४० किलोमीटर मार्गावर रेल्वे गाड्या चालविण्यात येत आहेत. कोकण रेल्वेने गेल्या २६ वर्षांत प्रगतीची अनेक शिखरे गाठली असली, तरी आर्थिक निधी अभावी अपेक्षित विकासाची गती राखण्यात कोकण रेल्वेला यश आले नाहे. त्याचा परिणाम कोकण रेल्वेच्या उत्पन्नावर झाला आहे. कोकण रेल्वेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शेअर रोखेद्वारे भांडवल उभे करण्यास कोकण रेल्वेला हिरवा कंदील दाखविला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील हॉल्ट स्टेशनांचे रूपांतर एक क्र ॉसिंग स्टेशनांमध्ये करण्याचे, तसेच मार्ग दुहेरीकरण करण्याचे काम सुरू आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास आरामदाई होणार आहे. कोकण रेल्वेतर्फे उभारण्यात येणाऱ्या नवीन पाच प्रकल्पांसाठी लागणाऱ्या १० हजार कोटी रकमेपैकी ३०५०कोटी रु पये कर्ज रोख्यांच्या माध्यमातून आणि उर्वरित रक्कम कर्जाद्वारे उभारण्यात येणार आहे. २०१७-१७ या वर्षात कोकण रेल्वेला रो-रो सेवेतून५७कोटी रु पये इतके उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती संजय गुप्ता यांनी दिली. यावेळी कोकण रेल्वेचे संचालक राजेंद्र कुमार, अमिताभ बॅनर्जी, मुख्य जनसंपर्क अधिकारी एल.के.वर्मा, आदी उपस्थित होते. >कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणयेत्या अडीच वर्षांत संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण होणार असून ‘कोरे’ला मिळालेल्या पुंजीतून विकासात्मक कामे हाती घेतली जाणार आहेत. या कामाची टेंडर प्रोसेस पूर्ण झाली असून महिनाभरात कामाला सुरुवात केली जाणार आहे. यामुळे रेल्वेसेवेतील वक्तशीरपणा वाढणार असून इंधन बचत होणार असल्याची माहिती कोकण रेल्वेने दिली.