शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
2
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
3
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
4
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
5
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
6
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
7
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
8
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
9
Pushpa 2: १००-२०० नाही तर तब्बल इतके कोटी, 'पुष्पा २'साठी अल्लू अर्जुनने घेतलं तगडं मानधन
10
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
11
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?
12
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
13
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
14
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
15
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
16
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
17
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
18
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
19
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
20
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल

पाच जणांना तीन वर्षांची शिक्षा

By admin | Published: April 19, 2017 2:44 AM

पवनी वनपरिक्षेत्रातील वायगाव वनबिटात पट्टेदार वाघाची सापळा रचून शिकार केल्याप्रकरणी कुख्यात आंतरराष्ट्रीय व्याघ्र तस्कर कुट्टू पारधी आणि त्याच्या

पवनी (भंडारा) : पवनी वनपरिक्षेत्रातील वायगाव वनबिटात पट्टेदार वाघाची सापळा रचून शिकार केल्याप्रकरणी कुख्यात आंतरराष्ट्रीय व्याघ्र तस्कर कुट्टू पारधी आणि त्याच्या चार साथीदारांना तीन वर्षाचा सश्रम कारावास व विविध कलमांतर्गत प्रत्येकी ४५ हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. पवनी न्यायालयाचे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस. एस. सय्यद यांनी मंगळवारी हा निकाल दिला.कुट्टू पारधीला आॅक्टोबरमध्ये उत्तरप्रदेशातील लखीमपूर जंगलात पकडण्यात आले होते. सध्या तो रासनलाल चंदन तस्करीच्या प्रकरणात कर्नाटकच्या हावेरी कारागृहात बंद होता. तेथून आणून मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. दुपारी १.५० वाजता न्यायाधीश सैय्यद यांनी कुट्टू पारधी व रासनलाल व इतर तीन आरोपींना भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ कलम ५०९ (८५) अंतर्गत दोषी ठरवून शिक्षा सुनावली. कुट्टू पारधी वगळता सर्व आरोपींनी दोन वर्षापर्यंत कारावास भोगल्यामुळे त्यांची आता एक वर्षाची शिक्षा शिल्लक आहे. कुट्टू पारधी मध्यंतरी फरार झाल्यामुळे त्याची १ वर्ष ९ महिने २ दिवस शिक्षा भोगणे शिल्लक आहे. (प्रतिनिधी)२सर्व न्यायालयीन कारवाई आटोपल्यानंतर दुपारी १.५० वाजता न्यायाधीश सय्यद यांनी सर्व आरोपींना बोलावून आदेशाची प्रत दिली. हे सर्व आरोपी सत्र न्यायालयात अपील करणार असल्याचे अ‍ॅड. एल. के. देशमुख यांनी सांगितले. आज सकाळी ११.२५ वाजता भंडारा कारागृहातून आरोपी जक्कू पारधी, बेनीराम पारधी, शैलेश पारधी यांना चोख पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले.