सोलापूर : औरंगाबाद येथील इज्तेमा संपवून गावी परतणा-या साथींच्या मोटारीला अपघात होऊन ५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी पहाटे सोलापूरजवळ उळे येथे झाला.औरंगाबादनजीक लिंबेजळगाव येथे मुस्लीम धर्मीयांचा इज्तेमा आयोजित करण्यात आला होता. सोमवारी या सोहळ्याचा समारोप झाला. त्यानंतर, कर्नाटक व सोलापूर येथील मुस्लीम बांधव आपल्या गावी परतत होते.त्यांच्यापैकीच एक मोटार भरधाव वेगाने सोलापूरला येत असताना, अचानक एक जनावर रस्त्यात आडवे आले. त्याला धडक देऊन मोटार रस्त्याकडेला थांबलेल्या जीपवर आढळली. थांबलेल्या जीपमधील तिघे तर मोटारमधील दोघे अशा एकूण ५ जणांचा मृत्यू झाला. जीपमधील काही जण चहा पिण्यासाठी खाली उतरल्याने त्यांचे प्राण वाचले. जखमींवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मृतांची नावेजमीर हुसेन दादासाहेब पाटील (३२), महंमद अखलाख पाशा पाटील (२६, दोघेही रा. पेनूर, ता. मोहोळ), टिपूसुलतान उमरसाब छप्परबंद (२६), अमीर हमजा लाडसाहेब नंदवाडगी (५०) आणी अब्दुल हुसेन छप्परबंद (५३, तिघेही रा. बसवनबागेवाडी, जि. विजयपूर) महंमद पाटील हा २००८ साली पोलीस खात्यात दाखल होता. तो अत्यंत मनमिळाऊ होता. चुलत भावाबरोबर तो इज्तेमासाठी गेला होता.बुलडाणा जिल्ह्यात ४ ठारबुलडाणा : मोताळा-मलकापूर मार्गावर २ वेगवेगळ्या अपघातांमध्ये ४ जण ठार झाले असून, १० जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. मोताळाजवळ झालेल्या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील ३ जण ठार, तर मलकापूर येथील अपघातात एका विद्यार्थ्याचा ट्रकखाली दबून मृत्यू झाला.चिंचपूर फाट्याजवळ अज्ञात वाहनाने मलकापूरकडून बुलडाण्याकडे जाणाºया प्रवासी आॅटोला धडक दिली. यात तन्वीर शेख शौकत (वय २), राशेदाबी शेख शौकत (२०) आणि शेख शौकत (२५) या तिघांचा मृत्यू झाला. मृत सर्व बुलडाणा येथील इंदिरा नगरमधील रहिवासी आहे. मलकापूर शहरानजीक यशोधाम परिसरात कापूस घेऊन जाणारा भरधाव वेगातील ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये दीपक सुरूशे (२२) हा जागीच ठार झाला.
इज्तेमावरून परतणा-या ५ जणांचा सोलापूरजवळ अपघातात मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 2:38 AM