मुंबई: जुलै महिन्यात कोसळणाऱ्या पावसाने मुंबईकर सुखावले आहेत. पण, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ताप आणि टायफॉईडच्या रुग्णांत किंचीत वाढ झाली आहे. अन्य साथीच्या आजारांचा आकडा मोठा वाटत असला तरी आजार आटोक्यात असल्याचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले. उन्हाळ््यानंतर सुरु झालेल्या पावसात वातावरणात होणारे बदल आरोग्यावर परिणाम करतात. वातावरणातील दमटपणामुळे विषाणूंचे प्रमाण वाढते. या विषाणूंचा संसर्ग झाल्याने मोठ्या प्रमाणात तापाच्या रुग्णांचा आलेख उंचावतो. यंदाही हाच ट्रेण्ड दिसून आला आहे. यंदा १ ते १५ जुलै दरम्यान मुंबईत तापाचे ७ हजार ९२२ रुग्ण आढळून आले आहेत. तर, टाफॉईडचे १०९ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत हे प्रमाण वाढलेले आहे. २०१५ मध्ये जुलै महिन्यांत टायफॉईडचे १२७ रुग्ण आढळले होते. २०१५ मध्ये जुलै महिन्यात तापाचे ३ हजार ४२३ रुग्ण आढळून आले होते. तर, २०१६ ला जून महिन्यांत तापाच्या रुग्णांचा आकडा ५ हजार ८०२ इतका होता. संसर्गामुळे तापाच्या रुग्णांचे प्रमाण वाढते. पण, स्वच्छता ठेवल्यास, खोकताना आणि शिंकताना तोंडावर रुमाल ठेवल्यास संसर्गाचा धोका कमी होतो. तसेच टायफॉईड हा दुषित अन्नातून होतो. त्यामुळे टायफॉईड टाळण्यासाठी शौचाला जाऊन आल्यावर आणि जेवणाच्या आधी हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे टाळले पाहिजे. उघड्यावरील दुषित अन्नपदार्थ खाल्यास पावसाळ््यात आजारी पडण्याचा धोका अधिक असतो. म्हणून दुषित अन्न अथवा दुषित पाण्यापासून होणाऱ्या आजारांना प्रतिबंध करणे शक्य असल्याचे डॉ. केसकर यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात डेंग्यू आणि लेप्टोस्पायरिससमुळे दोनजणांचा मृत्यू झाला आहे. गेल्यावर्षी लेप्टोस्पायरसिसने डोके वर काढले होते. गेल्यावर्षी जुलै महिन्यात लेप्टोचे २५७ संशयित रुग्ण आढळून आले होते. तर, यंदा १ ते १५ जुलैदरम्यान लेप्टोचे २०२ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. गेल्यावर्षी जुलै महिन्यात गॅस्ट्रोचे ९ हजार ७५२ रुग्ण आढळले होते. यंदा जुलै महिन्यांत १५ दिवसांत गॅस्ट्रोेचे ९ हजार ५२ रुग्ण आढळले आहेत. (प्रतिनिधी)गेल्यावर्षी लेप्टोस्पायरसिसने डोके वर काढले होते. यंदा १ ते १५ जुलैदरम्यान लेप्टोचे २०२ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. गेल्यावर्षी जुलै महिन्यात गॅस्ट्रोचे ९ हजार ७५२ रुग्ण आढळले होते. यंदा जुलै महिन्यांत १५ दिवसांत गॅस्ट्रोेचे ९ हजार ५२ रुग्ण आढळले आहेत.असतो.
जुलै महिन्यात आढळले तापाचे पाच हजार रुग्ण
By admin | Published: July 19, 2016 4:07 AM