शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

चार वर्षात पाच हजार लघुउद्योग बंद पडले!

By admin | Published: June 10, 2014 10:40 PM

छोट्या छोट्या निर्णयांसाठी लागणारा विलंब आणि थंडावलेल्या निर्णय प्रक्रियेचा फटका राज्यातील लघु उद्योगांना बसला असून गेल्या चार वर्षात राज्यातील ४८९४ लघुउद्योग बंद पडले आहेत.

चार वर्षात पाच हजार लघुउद्योग बंद पडले!आयुक्त पद वर्षानुवर्षे रिक्त, राजकीय उदासिनतेचा राज्याला फटकाअतुल कुलकर्णीमुंबई - छोट्या छोट्या निर्णयांसाठी लागणारा विलंब आणि थंडावलेल्या निर्णय प्रक्रियेचा फटका राज्यातील लघु उद्योगांना बसला असून गेल्या चार वर्षात राज्यातील ४८९४ लघुउद्योग बंद पडले आहेत. त्याचा फटका ३०,३६२ कामगारांना बसला आहे. सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांच्या पाठपुराव्याबाबत देखील शासनाची उदासीनता कारणीभूत ठरली असून २०१०-११ मध्ये या उपक्रमांचीफक्त ४.८३ टक्केच पुर्तता झाली आहे. शिवाय गेल्या दोन वर्षातील ही आकडेवारीच उपलब्ध नाही.अडीच वर्षापासून राज्याचे उद्योग आयुक्त हे पद रिक्त आहे. अनेक महिन्यापासून याचा पदभार फुटबॉल सारखा या अधिकार्‍यांकडून त्या अधिकार्‍याकडे दिला जात आहे. सध्या हे उद्योग सचिवांकडेच आयुक्तांचाही पदभार आहे. एका ज्येष्ठ अधिकार्‍याच्या मतानुसार देशात असलेल्या मंदीच्या लाटेमुळे महाराष्ट्राची प्रतिष्ठा काहीअंशी टिकून राहीली मात्र जे चित्र आज समोर आहे ते महाराष्ट्राला साजेसे नक्कीच नाही. उद्योगाच्या कोणत्याच क्षेत्रात सांगावी अशी प्रगती नाही. राज्याचे उद्योग धोरण देखील वर्षभर पडून राहीले. वर्षानंतर त्यात कोणतीही सुधारणा न करता ते मंजूर झाले. जर सुधारणा करायचीच नव्हती तर ते पडून का ठेवले गेले याचे उत्तर कोणीही देत नाही. मुंबईच्या बंदरातून क्रूड ऑईल आणि तत्सम गोष्टी गुजरातेत नेल्या जातात आणि तेथे पोर्ट विकसीत केलेले असल्यामुळे गुंतवणूक आणि रोजगारात गुजरात आपल्यापेक्षा कितीतरी पुढे गेले. आपल्याकडे आहे ते पोर्ट देखील विकसीत करण्याबाबत कमालीची अनास्था असल्याने जहाज कापण्यासाठीचे नवी मुंबईच्या जवळचे पोर्ट देखील अत्यंत बकाल अवस्थेत पडून आहे. परिणामी ऑगस्ट १९९१ ते ऑक्टोबर २०१३ या कालावधीत आपल्यापेक्षा ६,१७६ प्रकल्प कमी असताना गुजरातेत आपल्यापेक्षा २,४८,५३९ कोटींची अधीक गुंतवणूक झाली. आपल्या राज्यात दर लाख लोकसंख्येमागे ३१ कारखाने चालू आहेत. ज्यातील सरासरी दैनिक रोजगार १,३९१ एवढा आहे. त्याउलट पंजाबमध्ये हेच प्रमाण दर लाख लोकसंख्येमागे ६४ कारखाने व २१९७ लोकांना रोजगार असे आहे. छोट्याश्या गोव्यात देेखील हे प्रमाण ४३ आणि ३८२४ एवढे आहे. थेट परकीय गंुतवणुकीत देखील महाराष्ट्र कितीतरी मागे गेला असूृन एप्रिल २००६ ते मार्च २००७ मध्ये राज्यात ६४ प्रकल्पांपोटी १२,९१६ कोटींची परकीय गुंतवणूक झाली होती तेथे एप्रिल २०११ ते मार्च २०१२ या काळात १०५ प्रकल्पांमध्ये ती गंुतवणूक ५४५४ कोटींवर आली आहे.निर्णयांमधील विलंब, अधिकार्‍यांची वानवा, अनेक जागी वर्षानुवर्षे अधिकारी नसणे आहेत त्यातले देखील वर्षानुवर्षे न बदलले जाणे या कारणांचा फटका राज्यातल्या उद्योग जगताला बसल्याचेही सुत्रांचे म्हणणे आहे.