शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

ठाणे विकासाची पंचवार्षिक योजना

By admin | Published: March 31, 2017 6:07 AM

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी महासभेला सादर केलेला २०१७-१८ या वर्षीचा अर्थसंकल्प

ठाणे : ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी महासभेला सादर केलेला २०१७-१८ या वर्षीचा अर्थसंकल्प निवडणुकीच्या तोंडावर लोकानुनयी आश्वासने देणाऱ्या शिवसेनेचा नसून ठाणेकर जनतेचा आहे. नागरिकांनी आॅनलाइन व वृत्तपत्रांद्वारे अथवा सूचनापेटीतून केलेल्या ७५० सूचनांचा अंतर्भाव करून पुढील पाच वर्षांचा व्हिजन प्लॅन सादर केल्याचा दावा जयस्वाल यांनी केला आहे.ठाणेकरांना २४ तास पाणीपुरवठा करण्याकरिता हक्काचे धरण बांधण्यासह अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांची घोषणा आयुक्तांनी करून आपले लक्ष्य दूरगामी परिणाम करणाऱ्या योजनांवर भर देण्याचे असल्याचे सूचित केले आहे. कर आणि सोयीसुविधांचा ताळमेळ उत्तमरीत्या साधला आहे. गतवर्षीच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत आगामी अर्थसंकल्पात तब्बल ९०० कोटी रुपयांची घसघशीत वाढ सुचवली असून एकूण अर्थसंकल्प ३३९०.७८ कोटी रुपयांचा आहे. अर्थसंकल्प मांडताना शेवटच्या घटकाचा विचार केला असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. सामान्य नागरिकांच्या अपेक्षांचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात उमटावे, यासाठी प्रथमच नागरिकांकडून आॅनलाइन सूचना मागवण्यात आल्या होत्या. याशिवाय, महापालिका मुख्यालय आणि प्रभाग कार्यालयांमध्ये सूचनापेटींची व्यवस्था करून तसेच वर्तमानपत्रांच्या माध्यमातूनही नागरिकांकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या. महापालिकेच्या या आवाहनास नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. वर्तमानपत्रांव्यतिरिक्त आॅनलाइन पद्धतीने ६५०, तर सूचनापेटीतून १०० सूचना महापालिकेस प्राप्त झाल्या. या सूचनांचा विचार करून पाच वर्षांचा व्हिजन प्लॅन अर्थात महापालिकेचे धोरण आयुक्तांनी महासभेसमोर स्पष्ट केले. त्यानुसार रस्ते, पाणी, वीज, उड्डाणपूल आणि अन्य पायाभूत सुविधांच्या विकासावर आयुक्तांनी भर दिला. (प्रतिनिधी) - सविस्तर/३गतवर्षी महापालिका प्रशासनाने २५४९.८२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला होता. स्थायी समितीने त्यामध्ये १०९.५० कोटींची, तर महासभेने ७०.६८ कोटींची वाढ करून २७३० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर केला होता. यामध्ये आयुक्तांनी २४८३.२१ कोटी रुपये खर्चाचे अंदाज सुधारित केले. आगामी वर्षासाठी यामध्ये ९०७.५७ कोटी रुपयांची घसघशीत वाढ करून ३३९०.७८ कोटी रुपयांचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर केले.उत्पन्नाचे स्रोत आणि करवाढीच्या मर्यादा विचारात घेऊन पीपीपी, बीओटी किंवा कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून नवे प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस आयुक्तांनी या वेळी व्यक्त केला.स्थानिक संस्थाकर५० कोटींपेक्षा कमी वार्षिक उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांना स्थानिक संस्थाकर शासनाने माफ केला आहे. त्या मोबदल्यात भरपाई अनुदान आणि मुद्रांक शुल्क अनुदान महापालिकेस शासनाकडून प्राप्त होते. हे अनुदान आणि ५० कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांकडून मिळणारा स्थानिक संस्थाकर याद्वारे गतवर्षी महापालिकेने ७०० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित केले होते. आगामी वर्षासाठी या शीर्षकाखाली ७५६ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित केले आहे. केंद्र सरकारने १ जुलैपासून जीएसटी लागू केल्यास स्थानिक संस्थाकर रद्द केला जाईल. त्या मोबदल्यातही शासनाकडून भरपाई अनुदान मिळेल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.रस्ते रुंदीकरण आणि नूतनीकरण गेल्या २ वर्षांत १४.४४ किलोमीटर लांबीच्या १३ रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले होते. त्यापैकी ४.७५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम झाले असून उर्वरित कामे आगामी वर्षात पूर्ण केली जातील. विकास आराखड्यातील १७.६० किलोमीटर लांबीच्या १९ रस्त्यांचे काम प्रगतीपथावर असून ते कामही आगामी वर्षात पूर्ण केले जाईल.मुख्य चौकांमध्ये पावसाळ्यात खड्डे पडतात. या चौकांचे मास्टिक अस्फाल्ट पद्धतीने पुनर्पृष्ठीकरणाचे काम आगामी वर्षासाठी प्रस्तावित केले आहे. रस्ते विकासासाठी आगामी ५ वर्षांचा रस्ते विकास आराखडा तयार केला असून त्यानुसार गायमुखपासून दिव्यापर्यंत ८१ रस्त्यांचा विकास करण्याचे नियोजन आहे. याकरिता रस्ते मजबुतीकरण आणि रुंदीकरणासाठी १०० कोटी, विकास आराखड्यातील रस्ते रुंदीकरणासाठी १०० कोटी, तर मिसिंग लिंक रस्त्यांसाठी ६० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय, नवीन आदर्श रस्ते विकसित करण्यासाठी ६३ कोटींची तरतूद प्रस्तावित केली आहे. यूटीडब्ल्यूटी आणि सिमेंट काँक्रिटीकरण पद्धतीने ७५ रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले असून आगामी वर्षासाठी याकरिता ४६ कोटींची, तर गायमुख ते भिवंडी बायपासपर्यंत कोस्टल रोडसाठी ८ कोटींची तरतूद प्रस्तावित केली आहे. मुंबईकडून येणारी वाहतूक श्रीनगर, गायमुखमार्गे अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाकडे वळवणाऱ्या फूट हिल रोडच्या कामासाठी १० कोटींची तरतूद प्रस्तावित आहे.भांडवली मूल्यावर मालमत्ताकर आकारणी मालमत्तेच्या करयोग्य मूल्यावर सध्या कर आकारला जातो. महानगरपालिका अधिनियमानुसार तो इमारती आणि जमिनीच्या भांडवली मूल्यावर आधारित करआकारणी २०१८-१९ या आर्थिक वर्षापासून करण्याचे सूतोवाच आयुक्तांनी केले.प्रस्तावित प्रकल्पकॅडबरी जंक्शन येथे मत्सालय, नोकरदार महिलांसाठी सिद्धांचल परिसरात वसतीगृहवर्तकनगरात दुचाकी वाहनतळ आणि मॉल, बाळकूममध्ये महिला व्यायामशाळा आणि अभ्यासिकापोखरण रोड २ वर आंतरराष्ट्रीय दर्जाचे जिम्नास्ट सेटर आणि स्पोर्टस् कॉम्प्लेक्सभिवंडी रोडवर प्रादेशिक विज्ञान केंद्र, भिवंडी रोडवर अर्बन फॉरेस्ट्रीचा विकासकौसा आणि भार्इंदर पाड्यात संयुक्त स्मशानभूमि, दफनभूमिचा विकासओवळा, माजिवडा आणि रेतीबंदर येथे अग्निशमन केंद्र उभारणारकोलशेत येथे अद्ययावत सिने स्टुडिओ उभारणारप्रदूषण जनजागृतीसाठी मोबाइल अ‍ॅपशहरात विविध ठिकाणी ईलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन्सची उभारणीकावेसर येथे ट्रॅफिक पार्कचा विकासयेऊरच्या विकासासाठी ४.४५ कोटींची तरतूदउड्डाण पुलांचे पिलर आणि मोकळ्या भिंतींवर ‘वॉल गार्डन’रस्त्यांचे जाळेगेल्या २ वर्षांमध्ये ५२.४२१ किलोमीटरचे १०९ रस्ते प्रस्तावित करण्यात आले. या सर्व रस्त्यांचे काम आगामी वर्षात पूर्ण केले जाईल. रस्ते रुंदीकरणासाठी गतवर्षी ७६.५० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. आगामी वर्षात ८६.५० किलोमीटर लांबीच्या नवीन रस्त्यांसाठी २५४.५६ हेक्टर जमीन संपादित केली जाईल. भूसंपादनाचे हे काम टीडीआरच्या माध्यमातून केले जाईल. कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून आगामी वर्षात ४.६४ किलोमीटर लांबीच्या ७ रस्त्यांचा विकास आयुक्तांनी प्रस्तावित केला. कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून ही कामे होणार असल्याने महापालिकेची ११३ कोटी रुपयांची बचत होणार आहे.ठळक वैशिष्ट्येस्व. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी ५ कोटींची तरतूद3कोटी बाळकूम परिसरातील तरणतलावासाठी 9.50कोटी अंतर्गत जलवाहतूक सुरु करण्यासाठी 02 कोटी वर्तकनगरात बॉलिवूड पार्कसाठी शिक्षण व्यवस्थेत आमुलाग्र बदल करण्यावर भरसंपूर्ण शहरात वायफाय सेवा सुरु करणारचौपाट्यांचा सर्वांगिण विकासखाडी परिसराचा विकासअंतर्गत जलवाहतूक सुरु करणारआरोग्य सेवेत सुधारणामालमत्ताकरात १० टक्क्यांची वाढ वाहतुकीचे नियमनवाहतूककोंडीची समस्या सोडवण्यासाठी वाहनांच्या वर्दळीनुसार सिग्नल्सचा वेळ नियंत्रित करणारी अभिनव प्रणाली आणण्याचा मानस आयुक्तांनी व्यक्त केला. त्यासाठी उपग्रहामार्फत नियंत्रित होणाऱ्या गुगलच्या नेव्हिगेशन यंत्रणेसोबत सिग्नल्सचा ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न केला जाईल. यासाठी गुगलच्या उच्चपदस्थ प्रतिनिधींशी बोलणी सुरू असून याकरिता ७ कोटींची तरतूद प्रस्तावित आहेत. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास तो राबवणारी ठाणे महापालिका देशातील पहिली ठरेल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. वाहतूक पोलिसांना १०० ट्रॅफिक वॉर्डन महापालिकेमार्फत वर्षभरासाठी पुरवले जाणार असून त्यासाठी ८० लाख रुपयांची तरतूद प्रस्तावित केली आहे.स्मार्ट पार्किंग शहरातील रस्त्यांच्या कडेला ४५७१ दुचाकी, २२४२ तीनचाकी, २७०३ चारचाकी, २७०३ चारचाकी हलकी वाहने, तर ३३९ चारचाकी अवजड वाहनांच्या पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्याचे काम सुरू आहे. पार्किंग सुविधा उपलब्ध करणे आणि शुल्क वसूल करणे, यासाठी आॅपरेटर नियुक्त केले जाणार आहेत. या सुविधेचा नागरिकांना विनासायास लाभ घेता यावा, यासाठी मोबाइल अ‍ॅप्लिकेशन विकसित करण्याचे नियोजन आहे. या अ‍ॅपद्वारे नागरिकांना जवळपास कुठे पार्किंगची जागा उपलब्ध आहे, दर किती आहेत, याची माहिती तत्काळ मिळेल. याशिवाय, नागरिकांना पार्किंगबाबतच्या तक्रारीही या अ‍ॅपद्वारे करता येतील. यासाठी सुमारे ५२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.प्रस्तावित पूल आगामी वर्षात पादचाऱ्यांच्या सोयीसाठी घोडबंदर रोडवरील डोंगरीपाडा, भार्इंदरपाडा, गायमुख, बाळकुम अग्निशमन केंद्र, रेतीबंदर आणि विटावा येथील रस्त्यांवर पादचारी पूल तसेच माजिवडा आणि कॅडबरी जंक्शन येथे पादचारी भुयारी मार्ग प्रस्तावित असून त्यासाठी २० कोटींची तरतूद अपेक्षित आहे. कळवा खाडीवरील मुख्य पुलाच्या कामासाठी ४० कोटींची तरतूद प्रस्तावित आहे.लंडनच्या धर्तीवर क्लॉक टॉवरशहराची ओळख म्हणून लंडनच्या धर्तीवर ठाण्यात मुख्य ठिकाणी क्लॉक टॉवर उभारण्याचे काम अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आले आहे. याशिवाय मासुंदा तलाव, उपवन किंवा माजिवडा जंक्शनसारख्या मोक्याच्या ठिकाणी भव्य राष्ट्रध्वजस्तंभ उभारण्याचे कामही प्रस्तावित करण्यात आले आहे.महात्मा फुले  मार्केटचा पुनर्विकासमहात्मा फुले मार्केटचा पुनर्विकास करण्यासाठी ३ कोटी, मुंब्रा आणि दिवा येथे नवीन प्रभाग कार्यालयांसाठी ३ कोटी, नवीन दवाखान्यांच्या बांधकामासाठी १० कोटींची तरतूद प्रस्तावित आहे. तीनहातनाक्याजवळील विस्थापित गाळेधारकांसाठी मिनी मॉल बांधण्याचे नियोजन आहे. वर्तकनगर व कापूरबावडी येथेही हे मॉल होतील. खाडीचा विकासपर्यटनास चालना देण्यासाठी गायमुख खाडीचा विकास आणि विसर्जन घाट बांधण्यासाठी १० कोटींची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. पारसिक रेतीबंदर येथे ४२ एकर जागेत सिंगापूर आणि साबरमतीच्या धर्तीवर चौपाटी विकसित करण्यासाठी ७५ कोटींची निविदा मागवली आहे. या जागेवर विसर्जन घाट, अ‍ॅम्पी थिएटर, जॉगिंग ट्रॅक, यासाठी ५० कोटींची तरतूद आहे.अंतर्गत जलवाहतूक : ठाणे महापालिकेस ३२ किलोमीटर लांबीचा खाडीकिनारा लाभला आहे. केंद्र शासन आणि महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाच्या सहकार्याने येथे अंतर्गत जलवाहतूक सुरू करण्यासाठी ९.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. पहिल्या टप्प्यात वसई, मीरा-भार्इंदर, ठाणे, कोलशेत, घोडबंदर रोड, साकेत, दिवा, भिवंडी, कल्याण हा ४५ किलोमीटरचा जलवाहतूक मार्ग प्रस्तावित असून त्याचा खर्च २८७.९५ कोटी आहे. दुसऱ्या टप्प्यात साकेत ते बेलापूर रोड जलवाहतूक सुरू करण्याचे नियोजन आहे.शाई धरणासाठी २५ कोटीशहरात ठिकठिकाणी आवश्यकतेनुसार ४४ जलकुंभ आणि पंपहाउसचे काम प्रस्तावित करण्यात आले असून शाई धरणाच्या कामासाठी २५ कोटींची तरतूद प्रस्तावित करण्यात आली. ठाणेकरांना २४ तास पाणीपुरवठा व्हावा, यासाठी पाणीपुरवठा व्यवस्थेमध्ये मोठ्या सुधारणा प्रस्तावित असून ५ वर्षांत त्या पूर्ण करण्याचा मानस आयुक्तांनी व्यक्त केला. यासाठी ५० कोटींची तरतूद प्रस्तावित करण्यात आली.स्मार्ट मीटर२४ तास पाणीपुरवठ्याची योजना उथळसर प्रभाग समितीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाईल. त्यासाठी या भागातील १,१५,००० ग्राहकांच्या नळांवर जलमापके (मीटर) बसवली जातील. ठरावीक कालावधीनंतर या मीटरच्या नोंदी घेऊन वापरलेल्या पाण्याच्या प्रमाणात ग्राहकांना देयक दिले जाईल. जलमापके बसवण्याच्या खर्चाचा ५० टक्के वाटा नागरिकांना उचलावा लागेल. उर्वरित २० कोटींचा खर्च महापालिका उचलणार आहे.भुयारी गटार योजनाभुयारी गटार योजनेच्या तीन टप्प्यांची कामे प्रगतीपथावर असून घोडबंदर आणि दिवा भागासाठी या योजनेचा चौथा टप्पा विचाराधीन आहे. या प्रकल्पासाठी ८० कोटींची तरतूद प्रस्तावित आहे. आवश्यक तिथे छोट्या स्वरूपाची मलप्रक्रिया केंद्रे उभारण्यासाठी ५० लाख रुपये, तर गटारे तुंबण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी आधुनिक यंत्रे खरेदी करण्याकरिता १० कोटींची तरतूद प्रस्तावित आहे.कचऱ्यापासून वीजनिर्मितीडायघर येथे ६०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी कचरा वाहतुकीचा खर्च महापालिकेस करावयाचा असून त्यासाठी ८ कोटींची तरतूद, घनकचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी १५ कोटी, तर साफसफाईसाठी वाहनखरेदीकरिता २ कोटींची तरतूद प्रस्तावित आहे. याशिवाय, १२ फिरते स्वच्छतागृह खरेदीसाठी १.२५ कोटींची तरतूद प्रस्तावित करण्यात आली.तलावांचे सौंदर्यीकरणठाणे महापालिका क्षेत्रात ३६ तलाव असून या तलावांचे सौंदर्यीकरण आणि नूतनीकरण करण्याचे नियोजन आहे. त्याकरिता, तलाव पुनरुज्जीवन आणि शुद्धीकरणासाठी ३० कोटी, तर सुशोभीकरणासाठी ९.५० कोटींची तरतूद प्रस्तावित आहे. अनेक तलावांच्या सुशोभीकरणाचे काम प्रगतिपथावर असून, अन्य काही तलावांची कामे आगामी आर्थिक वर्षात केली जाणार असल्याचे प्रस्तावित आहे.पाच डायलेसिस केंद्रेशहरात ५ नवीन डायलेसिस केंद्रे उभारण्यासाठी २ कोटी, तर महापालिकेच्या ५ प्रसूतिगृहांमध्ये सोनोग्राफी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी २.२५ कोटींची तरतूद प्रस्तावित आहे. याशिवाय, कॅन्सरपूर्व निदान केंद्र, गरोदर मातांना प्रोटिन्सचा पुरवठा आणि वर्तकनगरातील डॉ. जोशी रुग्णालयाच्या पुनर्बांधणीसाठी पुरेशी तरतूद करण्यात आली. कौसा येथे १०० खाटांचे रुग्णालय बांधण्यासाठी ५ कोटींची तरतूद आहे. सेमी इंग्रजी स्मार्ट स्कूल३० शाळांमध्ये सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्यासाठी ३० लाख रुपये, तर मुंब्रा येथे रेल्वे प्लॅटफॉर्म परिसरात फिरणाऱ्या गरीब मुलांसाठी सिग्नल शाळेच्या धर्तीवर प्लॅटफॉर्म शाळा सुरू करण्यासाठी २५ लाख रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. सर्व शाळा संगणकाने जोडण्यासाठी आणि या शाळांच्या आधुनिकीकरणासाठी १.२५ कोटींची तरतूद प्रस्तावित आहे. झोपडपट्टी भागात ५ साक्षरता केंद्रे आणि दोन रात्रशाळांची निर्मिती विचाराधीन आहे.शहरात वायफाय सेवासंपूर्ण शहरात ठाणेकरांसाठी वायफाय सेवा सुरू केली जाणार असून त्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी १६०० सीसी कॅमेरे लावण्याकरिता ३० कोटींची तरतूद प्रस्तावित आहे. रस्त्यांवर आधुनिक एलईडी पथदिवे लावण्याकरिता २० कोटी, तर महापालिका शाळांमध्ये सीसी कॅमेरे लावण्याकरीता ६० लाखांची तरतूद प्रस्तावित आहे. शिक्षण विभागासाठी ४० कोटींची तरतूदठाणे : महापालिकेच्या अर्थसंकल्पात शिक्षण विभागासाठीही ४० कोटी १० लाखांची तरतूद असून शिक्षणसुधारणेसाठी काही नावीन्यपूर्ण उपक्रमांची घोषणाही करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने प्लॅटफॉर्म स्कूलसह १० सेमी इंग्रजी स्मार्ट स्कूलच्या घोषणांचा समावेश आहे.मागील वर्षाच्या सिग्नल शाळा, जकातनाका, व्हर्च्युल स्कूल रात्रशाळा या प्रकल्पांबरोबरच १० सेमी इंग्रजी स्मार्ट स्कूल निर्मितीसाठी ३० लाख रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. मुंब्रा येथे प्लॅटफॉर्म स्कूलसाठी २५ लाख शैक्षणिक सहकार्य सेतूसाठी १ कोटी २५ लाख, नागरी शिक्षण प्रशिक्षण केंद्रासाठी ३५ लाख, आदर्श शाळा प्रकल्पासाठी २५ लाख, साक्षर ठाणे प्रकल्पांसाठी १० लाख तसेच किसननगर आणि मुंब्रा येथे रात्रशाळांची निर्मिती प्रस्तावित आहे. शिक्षकांच्या उपस्थितीसाठी स्मार्ट आयडीकार्ड योजना राबवण्यात येणार आहे. त्याकरिता, २ कोटींची तरतूद केली आहे. डिजिटल शाळांची निर्मिती केली जाणार असून त्याच जोडीला पीपीपीच्या माध्यमातून दिव्यांग (अंध) विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक तथा बहुउद्देशीय संसाधन केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी पाच लाखांची तरतूद आहे. ‘झेप’ अंतर्गत जिद्द शाळेत संसाधन केंद्राची निर्मिती, विद्यार्थी उपस्थिती आणि पालक प्रोत्साहनभत्ता, कौशल्य विकास कार्यक्रम, ज्ञानरचनावाद याकरिता २० लाखांची तरतूद केली आहे.