शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

पाच वर्षांपासून समीरचा संपर्कच नाही

By admin | Published: September 18, 2015 12:45 AM

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला संशयित समीर गायकवाड हा गेल्या चार-पाच वर्षांपासून कुटुंबाच्या संपर्कातच नव्हता. सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक

सांगली : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला संशयित समीर गायकवाड हा गेल्या चार-पाच वर्षांपासून कुटुंबाच्या संपर्कातच नव्हता. सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक राहिल्याने त्याचे कुटुंबही त्याची फारशी चौकशी करीत नव्हते, पण समीरला पानसरेंच्या हत्येप्रकरणी अटक झाल्याचे समजताच त्याच्या कुटुंबियांना जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. पहिल्यांदाच आम्ही असल्या प्रकरणाला सामोरे जात असल्याची भावना त्याची भावजय सुनीता सचिन गायकवाड यांनी व्यक्त केली. समीर गायकवाड याच्या सांगली येथील घराबाहेर बुधवारी असलेला पोलीस बंदोबस्त कमी करण्यात आला आहे. घराबाहेर केवळ एक हत्यारबंद पोलीस आहे. समीरचे आजोबा भीमराव गायकवाड हे आजारी असल्याने त्यांना या सर्व प्रकरणाची कल्पना दिलेली नाही. सुनीता यांची भेट घेतल्यावर त्या म्हणाल्या, घरी आल्यावर ‘काय काम करतोस’, असे विचारले की, तो काहीच सांगत नसे. समीरचे पूर्वी संकेश्वरमध्ये मोबाईल दुरुस्तीचे दुकान होते. त्यानंतर त्याने तेथील दुकान बंद करून सांगलीत सुरू केले. तेही बंद करून तो ‘सनातन’च्या आश्रमात दाखल झाला. तो सणासुदीला दोन-चार दिवस सांगलीतील घरी येत असे. घरातील लोकांशी जास्त बोलत नसे. कोणी काही विचारले की, तेवढेच बोलायचा.प्रत्येकवर्षी तो गणेशोत्सवाला यायचा. आल्यानंतर घरातील एक खोली रंगवून स्वत: उत्सवाची तयारी करीत असे. यंदाही तो सोमवारी पहाटे घरी आला होता. दिवसभर त्याने खोलीतील पसारा काढून स्वच्छता केली. दुसऱ्या दिवशी (मंगळवार) रात्री साडेआठ वाजता तो खोली रंगविण्यासाठी रंग खरेदी करायला गेला होता. एकत्र जेवण करण्यासाठी आम्ही वाट पाहत बसलो होतो. तो साडेनऊ वाजले तरी आला नाही. त्यामुळे त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला, पण मोबाईल बंद होता. कदाचित तो मिरजेतील आश्रमात गेला असेल, असा विचार करून आम्ही पुन्हा त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला नाही, असे त्या म्हणाल्या.घरात पंचवीसभर पोलीसमंगळवारी रात्री साडेआठला गेलेला समीर दुसऱ्या दिवशीही आला नव्हता. मात्र दुपारी बारा वाजता अचानक पोलीस आले आणि घराची झडती सुरू केली. काय सुरू आहे, हे आम्हाला काहीच समजले नाही. शेवटी धाडस करून विचारल्यानंतर त्यांनी, समीरला गोविंद पानसरेंच्या खूनप्रकरणी अटक केल्याचे सांगितले. गणवेशातील आणि साध्या वेशातील २५ पोलीस घरात तळ ठोकून होते. घरातील सगळे साहित्य त्यांनी तपासले. पोलिसांनी जाताना काही साहित्य नेले आहे. अचानक झालेल्या या कारवाईमुळे आमचे हात-पाय गळून गेले होते. सासूबाई व पतीला मंगळवारी दुपारीच कोल्हापूरला नेले आहे, ते अद्याप परतलेले नाहीत, असे सुनीता म्हणाल्या.अ‍ॅड. प्रीती पाटील यांनी वकीलपत्र घेतलेगायकवाडचे वकीलपत्र अ‍ॅड. प्रीती पाटील यांनी घेतले आहे. अ‍ॅड. प्रीती या मडगाव बॉम्बस्फोटातील फरार आरोपी रुद्र पाटील याच्या पत्नी आहेत. रुद्र हा गेली सात वर्षे फरार असून त्याच्याविरुद्ध रेडकॉर्नर नोटीसही बजावण्यात आली आहे.संकेश्वर येथील दोन तरुण ताब्यातसंकेश्वर : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेतील संशयित समीर गायकवाड याच्या दोन मामेभावांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. समीर याचे बालपण व शिक्षण येथील त्याच्या आजोळी झाल्यामुळे याप्रकरणी चौकशीसाठी पोलसांनी समीर हा शिक्षणासाठी संकेश्वर येथील सपकाळ गल्लीतील आपल्या आजोळी होता. त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संकेश्वरमध्ये तर बारावी व आयटीआयपर्यंतचे शिक्षण गडहिंग्लजमध्ये झाले. शिक्षणानंतर संकेश्वर येथील गांधी चौकातील राजशेखर सायकल मार्ट दुकानालगत त्याने गुरूकृपा लाईट हाऊस नावाचे दुकान सुरू केले होते. जवळपास ७ वर्षापूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाल्याने तो संकेश्वरहून सांगलीला राहावयास गेला. समीरला तीन मामा व ६ मावशी असून त्यापैकी दोन मावशी सनातनच्या पूर्णवेळ साधक म्हणून काम पाहतात. त्यातूनच समीरचा सनातनशी संपर्क आला. सध्या समीर हा आई शांता, भाऊ सचिन व संदीप यांच्यासह सांगलीमध्ये राहतो. त्याचा मोठा भाऊ सचिन हा रिक्षा व्यावसायिक तर दुसरा भाऊ संदीप याचे इलेक्ट्रीकलचे दुकान आहे. घरगुती कार्यक्रमानिमित्त त्याचे आजोळी येणे-जाणे होते.सांगली येथील त्याच्या घरी, संकेश्वर, मुंबई-पनवेल व गोवा येथील ‘सनातन’च्या आश्रमांवर पोलिसांनी छापे टाकून चौकशी केली असता काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले. संशयित गायकवाड याच्या सांगली येथील घराची पोलिसांनी झडती घेतली असता २३ मोबाईल, चाकू व सनातन धर्माची काही पुस्तके मिळाली. ती सांगली पोलिसांनी सकाळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात दिली.