ऑनलाइन लोकमत
औरांगाबाद, दि. ४ - चीनमधून औरंगाबादसाठी विमानसेवा सुरु केल्यास वेरुळ - अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या चिनी पर्यटकांमध्ये वाढ होऊ शकते. चीन सरकारने या पर्यायाचा गंभीरपणे विचार करावा असे औरंगाबादचे महापौर त्र्यंबक तुपेंनी चीनचे उपराष्ट्रपती लि युवानचो यांना सूचना केली आहे. ते आज औरांगाबादच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी वेरुळ आणि अजिंठा लेणीची पाहणी केली. त्यानंतर महापौर तुपे यांची भेट घेतली.
औरंगाबाद आणि चीनमधील ड्युआंग शहरात सिस्टर सिटी करार झाला आहे. त्याचप्रमाणे चीन आणि भआरताच्या सांस्कृतिक जडणघडणीची देवाणघेवाण होणार असल्याचे सुत्राकडून समजते आहे.
चीनचे उपराष्ट्रपती ली युआनचो यांचे काल रात्री औरंगाबाद येथे विशेष विमानाने आगमन झाले. विमानतळावर महापौर त्र्यंबक तुपे, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
उपराष्ट्रपती ली युआनचो समवेत चीनचे भारतातील राजदूत ल युछंग यांच्यासह चीनमधील विविध खात्यांचे उपमंत्री तसेच अधिकारी येथे आले आहेत.