नवी दिल्ली : नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने देशाच्या हवाई नकाशावर नाशिकला स्थान दिले आहे. १ फेब्रुवारी २०१६ पासून एअर इंडियाचे ७० आसनी विमान उड्डाण करेल आणि विमान सेवा सुरू होईल.नाशिकजवळच्या ओझर विमानतळाचे संचालन एअर इंडिया आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि.द्वारे (एचएएल) संयुक्तपणे केले जाईल. उड्डाणांचे परिचालन एचएएल करेल तर प्रवासी आणि बाह्य संचलनाची जबाबदारी एअर इंडियाकडे राहील. ओझर विमानतळाची जबाबदारी एचएलकडे होती. परंतु व्यावसायिक उड्डाणे सुरू झाली नव्हती. याआधी नाशिकमध्ये एका खासगी कंपनीने विमान सेवा सुरू केली होती. परंतु अपेक्षित प्रतिसादाअभावी ही सेवा बंद करण्यात आली होती.सहा महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये विमानतळासाठी पायाभूत सुविधा देण्यात आल्या होत्या. त्यानंतर खा. हेमंत गोडसे यांनी नागरी हवाई वाहतूक विभागाचे अध्यक्ष आणि प्रबंध संचालकांना पत्र लिहून विमानतळाचा व्यावसायिक उपयोग करण्याची विनंती केली होती.
नाशिकमधून विमान सेवा १ फेब्रुवारीपासून
By admin | Published: December 02, 2015 2:08 AM