शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
4
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
5
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
6
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
7
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
8
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
9
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
11
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
12
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
13
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
14
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
15
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
17
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
18
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
19
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
20
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?

पुराचे पाणी मराठवाड्यात येणार; मुख्यमंत्र्यांचे निर्देश, वर्ल्ड बँक करणार आर्थिक मदत

By ओमकार संकपाळ | Published: July 07, 2022 7:07 PM

'सांगली आणि कोल्हापूरमध्ये येणाऱ्या पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्यात येणार.'- देवेंद्र फडणवीस

मुंबई: आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना महत्वाचे निर्देश दिले. यात पश्चिम महाराष्ट्र, विशेषतः सांगली आणि कोल्हापूरमध्ये येणाऱ्या पुराचे पाणी मराठवाड्यात वळवण्याबाबत चर्चा झाली. याबाबत सरकार सकारात्मक असून, वर्ल्ड बँकही मदत करण्यास तयार आहे, अशी माहिती फडणवीसांनी दिली.

पुराचे पाणी मराठवाड्यातबैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, '2019 साली सांगली आणि कोल्हापूरला महापूर आला होता, त्या पुरामुळे मोठी हानी झाली होती. यापुढे अशा प्रकारचा पूर आला तर काय करायचं, याबाबत त्यावेळेस एक अभ्यास केला होता. त्यात वळण बंधारे आणि टनल सिस्टीमद्वारे पूराचे पाणी मराठवाड्यात वळवण्यावर विचार झाला. त्या संदर्भात वर्ल्ड बँकेसोबत बैठक झाली, त्यांनी यासाठी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. मुख्यमंत्र्यांनीही त्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. तात्काळ याचा डीपीआर तयार करुन तो वर्ल्ड बँकेकडे मान्यतेसाठी पाठवण्यात यावा, याबाबतही निर्देश दिले आहेत,' अशी माहिती फडणवीसांनी दिली. 

इतर अनेक महत्वाचे निर्देश'याव्यतिरिक्त समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्या खोऱ्यात नेण्यावरही विचार झाला होता, आजच्या बैठकीत यावरही चर्चा झाली. त्यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. याशिवाय वैनगंगा-नळगंगा प्रकल्पातून वाहून जाणारे पाणी टनलच्या माध्यमातून 450 किमी आणून अनेक जिल्ह्यांना त्याचा वापर कसा होईल, याबाबतही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. गेल्या सरकारमध्ये हे सर्व प्रकल्प का रखडले, हे सर्वांनाच माहिती आहे. पण, आता मी आणि एकनाथ शिंदे यांनी हे सर्व प्रकल्प वेगाने पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे,' असंही फडणवीस म्हणाले. 

19 लाख शेतकऱ्यांना मदत होणारते पुढे म्हणाले की, 'या बैठीकत अजून एका प्रकल्पावर चर्चा झाली. 2019 साली जो स्मार्ट प्रोजेक्ट मंजूर केला होता, त्या अंतर्गत महाराष्ट्रात 10 हजार अॅग्री बिझनेस सोसायट्या तयार करुन 19 लाख शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भात आणि एंड टू एंड व्हॅल्यू चेन तयार करण्यासंदर्भातला प्रोजेक्ट होता, याला 3 हजार कोटी वर्ल्ड बँकेने दिले होते. दुर्दैवाने या प्रोजेक्टमधले फक्त 15 कोटी गेल्या अडीच वर्षात खर्च झाले. त्या प्रोजेक्टचे नाव आता बाळासाहेबांच्या नावाने आहे. आता या प्रोजेक्टला फास्ट ट्रॅकवर आणण्यासाठी टाईम टेबल तयार झाला आहे. यातून शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला फायदा होईल. यासाठी जलद गतीने कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले,' अशीही माहिती त्यांनी दिली.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेfloodपूरMarathwadaमराठवाडा