सोलापूर : मंगळवारी इंद्रायणी नदीला पूर आल्याने उजनीत येणारा विसर्ग वाढला आहे. उजनी धरण मंगळवारी प्लसमध्ये आले.मंगळवारी सकाळी ६ वाजता ३५ हजार २१७ क्युसेकनी दौंडमधून विसर्ग सुरू होता. दुपारी १२ वाजता १० हजार क्युसेकनी वाढ होऊन ४४ हजार ४६२ क्युसेक स्थिर झाला.
उजनी धरण मंगळवारी दुपारी १ वाजता मायनसमधून प्लस १.१३ टक्क्यांमध्ये आले. सायंकाळी ६ वाजता दौंडमधून ५४ हजार १६६ क्युसेकनी विसर्ग येत होता. बंडगार्डनमधून ३४ हजार ३०० क्युसेकनी विसर्ग येत होता. सोमवारी दुपारपासून मावळ भागात जोरदार पाऊस पडला तर मंगळवारी पहाटेपासूनच जोरदार पाऊस पडत होता. अजूनही सोलापूर जिल्हा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. परंतु
पुणे जिल्ह्यातील भीमा खोºयात मोठ्या प्रमाणावर पडत असणाºया पावसामुळे सर्व धरणातील पाणीपातळीत वाढ झाली आहे. जून महिन्यात पाऊस पडला नसल्याने संपूर्ण सोलापूर जिल्हा उजनीवर अवलंबून राहिला होता. अजूनही पुणे जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्याने सर्व धरणातील पाणी साठ्यात भरपूर वाढ झाली आहे. त्यामुळे येणाºया काळात उजनीत पाणी भरपूर प्रमाणात येणार आहे. अजून दोन दिवस पाऊस राहिला तर उजनी ५० टक्क होईल.
- उजनीची सद्यस्थिती
- - एकूण पाणीपातळी
- ४९१.२०० मीटर
- - एकूण पाणीसाठा
- १८३६.६६ दलघमी
- - उपयुक्त पाणीसाठा
- ३३.८५ %
- - टक्केवारी ४
- - एकूण टीएमसी
- ६५.१०
- - उपयुक्त टीएमसी
- १.२०
पुणे जिल्ह्यातील धरणांची टक्केवारी
१) पिंपळजोगे ०.०% २) माणिकडोह ३५ %३) वडगाव ६५ %४) वडज ५० %५) डिंबे ६८ %६) घोड ७ %७) विसापूर २%८) कळमोडी १००%९) चासकमान १००%१०) भामाआसखेड ८०%११) वडिवळे ९३%१२) आंध्रा १०० %१३) पवना ७० %१४) कासारसाई ८७ %१५) मुळशी ७३ %१६) टेमघर ६०%१७) वरसगाव ६५ %१८) पानशेत ८० %१९) खडकवासला १००%