नवरात्रोत्सवानिमित्त सफरचंद, केळी आदींची मोठी आवक जालना बाजारपेठेत दिसून येत आहे़ पुढचे दहा दिवस जवळपास उपवासाचे असल्याने रताळासह लिंबू, हिरव्या मिरचीला मोठी मागणी राहणार आहे़
बाजारपेठेत भेंडी, पालेभाज्यांची मोठी आवक दिसून येत असून, कार्ल्याच्या १० किलोला १६० रुपयांचा दर घाऊक बाजारपेठेत आहे़ भेंडीच्या करंड्या १० किलोमागे २५० रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत़ उपवासाचे दिवस असल्याने डाळिंब, सफरचंद, केळी आदींचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत ५ ते १० रुपयांनी वाढले आहेत़
जळगाव जिल्ह्यातून केळीची आवक वाढली आहे़ ढोबळी मिरची, कोथिंबीर, दोडके, भोपळा, गवारीच्या शेंगा, टोमॅटो आदी सर्व प्रकारच्या भाज्यांची जालना बाजारपेठेत चांगलीच उलाढाल वाढली असल्याचे गेल्या आठवड्यासह या सप्ताहात दिसून येत आहे़