लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सोशल मीडियावरील फेसबुक व ईमेलच्या माध्यमातून व्यवसायासाठी संपर्क साधून काठेगल्लीतील एकास तीन लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काठेगल्लीतील रहिवासी शिवाजी माधवराव जाधव (५७, रा. अमृता हाइट्स, सिटीकेअर हॉस्पिटलच्या मागे, काठेगल्ली, नाशिक) यांच्यासोबत एका संशयिताने मार्च ते २२ जुलै २०१७ या कालावधीत फेसबुक आणि ईमेलच्या माध्यमातून संपर्क साधला. वेटरलाइफ फार्मास्युटिकल कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासवून संशयिताने जाधव यांच्याकडून असिलाबिटीया सीड या व्यवसायाच्या नावाखाली वेळोवेळी तीन लाख रुपये घेतले़जाधव यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली़
फेसबुकच्या माध्यमातून तीन लाखांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 7:40 PM