ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - रेल्वेमंत्री सुरेश प्रभू गुरुवारी रेल्वे अर्थसंकल्प सादर करत असताना मुंबईकर रेल्वे प्रवाशांना भरपूर अपेक्षा होत्या. मात्र उपनगरी रेल्वे प्रवाशांना सुखावेल अशी कोणतीही घोषणा प्रभूंनी केली नाही.
छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल दरम्यान उन्नत मार्ग आणि चर्चगेट विरार दरम्यान एलिव्हेटेड कॉरीडॉरच्या निर्मितीची घोषणा केली मात्र सध्या होत असलेल्या त्रासातून सुटका होईल अशी कोणतीही घोषणा केली नाही.
अपघाताना कारणीभूत ठरणा-या रेल्वे फलाटांची उंची वाढवण्याव्यतिरिक्त उपनगरीय रेल्वे प्रवाशांना सुखावणारी कोणतीही घोषणा प्रभू यांनी केली नाही. असहय्य झालेल्या गर्दीतून प्रवास सुकर व्हावा यासाठी उपनगरीय मार्गावरील रेल्वे गाडया वाढवण्याची घोषणा प्रभू करतील अशी प्रवाशांना अपेक्षा होती. मात्र त्यांचा भ्रमनिरास झाला आहे.
एलिव्हेटेंड मार्ग ही सध्या फक्त घोषणाच आहे अशी भावना सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांनी व्यक्त केली. फक्त टाळलेली तिकिट दरवाढ हीच काय ती समाधानाची बाब आहे असे प्रवाशांनी सांगितले.
बजेटशी संबंधित सर्व बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा.