शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

लाईट बिल जास्त येतं? कमी करण्यासाठी या टीप्स फॉलो करा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 5:13 PM

मान्सूनने आता परतीची वाट पकडली आहे. काही दिवसातच ऑक्टोबर हिट सुरू होणार असून, या महिन्यात तापमानात लक्षणीय वाढ होत असते. त्यामुळे घरातील फॅन, एसी या उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत असतो.

मुंबई: मान्सूनने आता परतीची वाट पकडली आहे. काही दिवसातच ऑक्टोबर हिट सुरू होणार असून, या महिन्यात तापमानात लक्षणीय वाढ होत असते. त्यामुळे घरातील फॅन, एसी या उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत असतो. त्यामुळे वीज बिलातही मोठ्या प्रमाणात वाढ होते.अशा परिस्थितीत आपल्याला वीज बिल कमी हवे असते. घरातील सर्व उपकरणे वापरुन वीज बिल कसे कमी करावे याच्या टीप्स अदाणी इलेक्ट्रिसिटीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिल्या आहेत.

ऑक्टोबर महिन्यापासून एसी, फ्रीज, फॅन या उपकरणांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो.ही उपकरणे वापरल्यामुळे आपली वीज बिले मोठ्या प्रमाणात येत असतात.जर आपण ही उपकरणे वापरताना कळजी घेतली तर आपले वीज बिल कमी येऊ शकते.यासाठी आपण अशी उपकरणे वापरत असताना अधिक जागरूक राहणे आवश्यक आहे. यासाठी काही आवश्यक टीप्स वीज ग्राहकांनी अनुसरायला हव्यात.  चला तर मग या टीप्स काय आहेत जाणून घेऊया.  

 

Passport Apply : पोस्‍ट ऑफिसद्वारे झटपट बनवता येणार पासपोर्ट! जाणून घ्या, संपूर्ण प्रोसेस...

एसी

उन्हाळ्यात आपल्याकडे एसी नेहमी चालू ठेवावा लागतो. एसीमुळे आपले वीज बिल मोठ्या प्रमाणात येऊ शकते. पण जर तुम्ही एसी योग्य पद्धतीने वापरला तर तुमचे वीज बिल कमी येऊ शकते. एसी नेहमी २४ अंशांवर ठेवावे. हे एक योग्य तापमान असून प्रत्येक अंश कमी झाल्यास ५% अतिरिक्त वापर होतो.

फाईव्ह स्टार 

आपण फॅन, एसी अशी उपकरणे खरेदी करत असताना ती उपकरणे  नेहमी ५-स्टार मानांकन आहेत का पाहून खरेदी करावीत. एसी/रेफ्रिजरेटर/फॅन ही उपकरणे खरेदी करत असताना यांनाच त्यावर फाईव्ह स्टार आहेत हे प्राधान्याने पाहायला हवे.कारण ते अधिक ऊर्जा कार्यक्षम आहेत.तसेच ते उत्तमदेखील आहे.

उपकरणांची देखभाल 

विद्युत उपकरणांची नियमित देखभाल ही एक गुरुकिल्ली आहे. तुमच्या एसीमुळे अनावश्यक वीजेचा वापर तर होत नाही ना याची खात्री करण्यासाठी नियमितपणे त्याची देखभाल व दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

मोबाइलवर गेम खेळाणाऱ्यांना बसणार मोठा झटका! बंद होणार कमाईची सर्व मार्ग

ऊर्जेचा अपव्यय टाळा

ऊर्जेचा अपव्यय टाळा, तुमचा एसी सुरू असताना खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा. रेफ्रिजरेटरचे दार सतत उघड वा बंद करू नका, किंवा ते अधिक वेळेसाठी उघडे ठेवू नका.