शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
4
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
5
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
6
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
7
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
8
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
9
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
11
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
12
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेशाद्रीने सांगितली आठवण
13
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
14
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
15
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
16
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
17
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
18
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
20
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!

मुंबईसह राज्यभरात किसानपुत्रांचे अन्नत्याग आंदोलन

By admin | Published: March 20, 2017 3:16 AM

सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी रविवारी राज्यभरातील शेतकऱ्यांनी एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन

मुंबई : सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी रविवारी राज्यभरातील शेतकऱ्यांनी एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन केले. या आंदोलनात मुंबईतील किसानपुत्रही सहभागी झाले होते. शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी अन्नदान आंदोलनासाठी शेतकऱ्यांना आवाहन केले होते. त्याला राज्यभरासह मुंबई व उपनगरातील किसानपुत्रांनीही साथ दिली. मुंबईसोबतच उपनगरात राहाणाऱ्या किसानपुत्रांनी दिवसभर उपवास केला. त्यानंतर, संध्याकाळी मनोरा आमदार निवासाच्या समोरच्या हिरवळीवर एकत्र येत, सरबत पिऊन उपवासाची सांगता करण्यात आली. विशेष म्हणजे, या ठिकाणी कसल्याही प्रकारच्या घोषणा किंवा भाषण न करता, शांततापूर्ण मार्गाने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली, तसेच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. ३१ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी म्हणजे, १९ मार्च रोजी साहेबराव करपे या यवतमाळमधील चिलगव्हाणच्या शेतकऱ्याने कुटुंबासह आत्महत्या केली होती. जाहीररीत्या झालेली ही पहिली शेतकरी आत्महत्या मानली जाते. नंतरच्या काळात हजारो शेतकरी आत्महत्या झाल्या. सरकार बदलत गेले, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत. शेतकऱ्यांचे दु:ख समजून हे आंदोलन लोकचळवळ व्हावी, असे मत आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी महागाव येथे शेतकरी करपे यांना श्रद्धांजली वाहतना व्यक्त केले. तर, गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असून, त्यांच्याप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी दिवसभर उपवास करत, संध्याकाळी लिंबू सरबत पिऊन उपवास सोडल्याचे निमंत्रक अनिल गावंडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)