शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

झोपडपट्ट्यांत घडताहेत फुटबॉलपटू

By admin | Published: November 06, 2016 9:16 AM

शाळा सोडलेली, व्यसनाधीन झालेली, हाणामाऱ्या करणारी झोपडपट्ट्यांतील मुले आता चक्क फूटबॉल चॅम्पियन बनू पाहत आहेत.

ऑनलाइन लोकमत

अहमदनगर, दि. 6 - शाळा सोडलेली, व्यसनाधीन झालेली, हाणामाऱ्या करणारी झोपडपट्ट्यांतील मुले आता चक्क फूटबॉल चॅम्पियन बनू पाहत आहेत. नगर शहरात असे चाळीस फूटबॉल पटू तयार झाले आहेत. सध्या हा संघ नागपूरला राज्यस्तरीय स्पर्धा खेळतोय. नगर शहरात बालभवन ही संस्था झोपडपट्ट्यांमध्ये शिक्षणाचे काम करते. दररोज संध्याकाळी झोपडपट्टीत वर्ग भरवून तेथे मुलांचा अभ्यास घेतला जातो. या वर्गांत येणाऱ्या तसेच इतर शाळाबाह्य मुलांनाही शाळांची गोडी लागावी यासाठी बालभवनने फूटबॉल सुरू केला. या मुलांना फूटबॉल खेळायला लावला. त्यातून ही मुले अगोदर संस्थेत व नंतर शाळेत रमू लागली. सध्या दररोज चाळीस मुले पेमराज सारडा महाविद्यालयाच्या मैदानावर दररोज सायंकाळी फूटबॉल खेळतात. या मुलांत १२ ते १७ वयोगटांची मुले आहेत. बालभवनने एक नियमही बनविलाय. ‘नो स्कूल, नो फूटबॉल’. म्हणजे मुले शाळेत गेली नाही तर त्यादिवशी मैदानावर त्याला खेळू दिले जात नाही. ‘स्लम सॉकर’ नावाची एक संस्था आहे. ही संस्था झोपडपट्ट्यांतील मुलांसाठी फूटबॉलची स्पर्धा घेते. बालभवनला ही माहिती मिळाल्यानंतर नगरचा संघ आता नागपूर येथील या स्पर्धेत सहभागी झाला आहे. १३ व १४ आॅक्टोबरला ही स्पर्धा होत असल्याचे बालभवनचे संचालक हनिफ तांबोळी यांनी सांगितले. या राज्यस्तरीय स्पर्धेनंतर मुलांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठीही निवड होणार आहे.बालभवनच्या टीममधील काही मुलांनी शाळांच्या माध्यमातून विविध स्तरावर चांगली कामगिरी केली. अविनाश घोरपडे नावाचा नववीतील मुलगा विभागीय स्तरावर खेळला आहे.