शहरं
Join us  
Trending Stories
1
Hathras Stampede : हाथरसचं सत्संग मैदान बनलं 'स्मशानभूमी'; चेंगराचेंगरीतील ११६ जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
2
मविआच्या ३ उमेदवारांमुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत चुरस; माघार की घोडेबाजार? फैसला शुक्रवारी
3
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य : ३ जुलै २०२४; आजचा दिवस नोकरदारांना लाभदायक, घरात आनंदाचे वातावरण
4
रुग्णालयाबाहेर मृतदेहांचा खच, आक्रोश अन् किंकाळ्या...; मृतदेह पाहून शिपायाला हार्ट अटॅक
5
नीट प्रकरणात दोन्ही आरोपींना ५ दिवसांची CBI कोठडी; पालकांनाही आरोपी करण्याची मागणी
6
जुलैत पावसाची सेंच्युरी; सरासरीपेक्षा १०६ टक्के बरसण्याचा अंदाज
7
मराठा आरक्षणाविरोधी याचिकांमध्ये मागासवर्ग आयोग महत्त्वाचा प्रतिवादी
8
MSRDC चे प्रकल्प, कार्यालये सौरऊर्जेने उजळणार; संपूर्णपणे अक्षय्य ऊर्जेच्या वापराच्या दिशेने पाऊल
9
बाबूजी सामान्यांचा आवाज, विचारांची बांधील राहून पत्रकारितेची मूल्ये जपली -  विजय दर्डा
10
आधी हिजाबबंदी, आता जीन्स, टी-शर्टलाही मनाई; कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी नवा ड्रेसकोड
11
नौदल अधिकारी गुंतले मानवी तस्करीत; गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक माहिती
12
पासपोर्ट सेवा केंद्र भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई; दीड कोटीची रोकड, डायऱ्या दलालांकडून जप्त
13
दुधाची नाशवंतता संपली; मग हमीभाव का नाही?; दीर्घकालीन उपाय करण्याची आवश्यकता
14
जगातलं सर्वांत कमी उंचीचं जोडपं! लोकांच्या टोमण्यांचा सामना करावा लागला, पण आज..
15
भावना गवळी, कृपाल तुमानेंना विधानपरिषदेची उमेदवारी; शिंदे गटात नाराजी
16
...तर तो पक्ष लोकांचा पक्ष झाला पाहिजे; राहुल गांधी यांचा उदय, घसरण आणि पुन्हा उदय
17
उमेदवारच झाला संकट! बायडेन यांच्या सुमार कामगिरीमुळे पक्षात अंतर्गत वादविवादच सुरू
18
"सलग तिसऱ्यांदा १०० च्या आत, तिसरा पराभव, तरीही काँग्रेस आणि त्यांची इकोसिस्टिम...", मोदींचा खोचक टोला
19
"बाबूजी म्हणजे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील खणखणीत नाणे", देवेंद्र फडणवीसांकडून स्व. जवाहरलाल दर्डांना अभिवादन
20
“जयंत पाटील तुम्ही नकली वाघांसोबत आहात, जरा असली वाघांसोबत या”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्याच्या इतिहासात प्रथमच महिला अधिकारी मुख्य सचिव; सुजाता साैनिक यांनी स्वीकारला पदभार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 5:33 AM

प्रशासन आणि पोलिस प्रशासन या दोन्हींचे नेतृत्व महिलांकडे असल्याचा योग पहिल्यांदाच जुळून आला आहे.

मुंबई - राज्याच्या मुख्य सचिवपदी १९८७च्या तुकडीतील ज्येष्ठ आयएएस अधिकारी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली. हे पद भूषविणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. पती व पत्नी दोघेही राज्याच्या मुख्य सचिवपदावर पोहोचले अशी महाराष्ट्रातील ही पहिलीच वेळ आहे.मुख्य सचिव डॉ. नितीन करीर हे ३० जून रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी राज्य सरकारने सुजाता सौनिक यांची नियुक्ती केली. त्यांनी रविवारी सायंकाळी करीर यांच्याकडून पदभार स्वीकारला. त्या जून २०२५ मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांचे पती मनोज सौनिक हे करीर यांच्याआधी राज्याचे मुख्य सचिव होते. 

प्रशासन अन् पोलिस प्रशासन महिलांकडेचप्रशासनाची धुरा आता सुजाता सौनिक यांच्याकडे तर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी पोलिस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांच्याकडे आहे. प्रशासन आणि पोलिस प्रशासन या दोन्हींचे नेतृत्व महिलांकडे असल्याचा योग पहिल्यांदाच जुळून आला आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र