यदु जोशी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मंत्रालयात प्रवेशासाठी लवकरच आधार कार्डाची सक्ती केली जाऊ शकते. गृह विभागानेच सुरक्षेच्या दृष्टीने तशी सूचना केली आहे. गृह विभागाने केलेल्या विविध सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग एक आराखडा तयार करीत असून त्याची अंमलबजावणी येत्या सहा महिन्यांत केली जाणार आहे.मंत्रलयात येऊन विषप्राशन करणे, गोंधळ घालणे, आत्मदहनाचा इशारा देणे असे प्रकार सध्या वाढीस लागले असून त्यातून तणाव निर्माण होतात. या प्रकारांवरही नियंत्रण आणले जाणार आहे. यापुढे तुम्हाला मंत्रालयात ज्या मजल्यावर काम असेल त्याच मजल्यसाठीचा प्रवेश पास दिला जाईल आणि तो पास गळ््यात टाकून जावे लागेल. त्यावर नमूद केलेल्या माजल्याव्यतिरिक्त कुणी भलत्याच मजल्यावर गेले तर साध्या वेशातील पोलीस तत्काळ मज्जाव करून तुम्हाला परत पाठवतील. आधार कार्डामुळे संबंधित व्यक्तीचे नाव, गाव, पत्ता यासह विविध प्रकारची माहिती मंत्रालय सुरक्षा यंत्रणेला एका क्लिकवर कळू शकेल. अभ्यागतांसाठी (व्हिजिटर्स) एक प्रतीक्षालय गार्डन गेटजवळ बांधण्यात येणार आहे.
मंत्रालयात आधारकार्ड सक्ती
By admin | Published: July 01, 2017 2:40 AM