मुंबई : मोनो आणि मेट्रो रेल्वेसारख्या पायाभूत प्रकल्पांना परवानगी देण्याचे अधिकार महापालिकेकडून काढून घेण्याची तरतूद विकास नियोजन आराखड्यातून करण्यात आली आहे़ मात्र या तरतुदीमुळे खवळलेल्या शिवसेनेने आयुक्त मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरुन निर्णय घेत असल्याचा आरोप केला़ यास भाजपानेही प्रत्युत्तर दिल्यामुळे सत्ताधाऱ्यांमध्ये आज चांगलीच जुंपली़शिवसेना भाजपा या मित्रपक्षामध्येच दररोज खटके उडत आहेत़ पालिकेची आगामी निवडणूक उभय पक्ष स्वतंत्र लढविण्याच्या तयारीत असल्याने वाद उकरुन काढण्यात येत असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे़ त्यात नवीन वादाला आज तोंड फुटले़ नगरसेवकांच्या अधिकारावरच गदा आणण्याची तरतूद विकास आराखड्यात करण्यात आल्याचा आरोप सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी केला़या विषयावर हरकुतीचा मुद्दा त्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित केला़ मात्र ही केवळ शिफारस असून यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही़ त्यामुळे आधीच ओरड करुन सभेचा वेळ वाया घालवू नये, असे भाजपाच्या सदस्यांनी शिवसेनेच्या नेत्यांना सुनावले़ त्यामुळे शिवसेना भाजपामध्ये चांगलीच जुंपली़ मात्र या विषयावर विरोधी पक्षांनी साथ दिल्यामुळे शिवसेनेने भाजपाला एकटे पाडले़ या शिफारशीवर आक्षेपमोनो मेट्रोसह परिवहन सेवेतील बदलाकरिता पालिकेच्या परवानगीची भविष्यात गरज राहणार नाही़ राज्य सरकारच्या परवानगीने एमएमआरडीए विकास आराखड्यात बदल करु शकणार आहे़ मात्र ही केवळ शिफारस असून यावर हरकती व सुचना मागविण्यात येतील़ त्यानंतर पालिका महासभेत मंजूर करुन हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचे, प्रशासनाने स्पष्ट केले़ (प्रतिनिधी)
अधिकारवादातून सेना-भाजपात जुंपली
By admin | Published: May 12, 2016 3:33 AM