राहुल गांधींना माफी मागायला भाग पाडा; वीर सावरकरांच्या नातवाची उद्धव ठाकरेंकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 11:53 AM2023-03-28T11:53:55+5:302023-03-28T11:57:45+5:30

विरोधकांच्या बैठकीत शरद पवारांनी सावरकरांबाबत जे मत व्यक्त केले ते स्वागतार्ह आहे असंही रणजित सावरकर म्हणाले.

Force Rahul Gandhi to apologize; Veer Savarkar's grandson's Ranjit Savarkar demand to Uddhav Thackeray | राहुल गांधींना माफी मागायला भाग पाडा; वीर सावरकरांच्या नातवाची उद्धव ठाकरेंकडे मागणी

राहुल गांधींना माफी मागायला भाग पाडा; वीर सावरकरांच्या नातवाची उद्धव ठाकरेंकडे मागणी

googlenewsNext

मुंबई - स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जो अपमान राहुल गांधींनी केला आहे. त्यासाठी त्यांना माफी मागायला भाग पाडा, अन्यथा तुमच्या बोलण्याला काही अर्थ नाही अशी मागणी वीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी केली  आहे. राज्यात सुरू असलेल्या सावरकर वादाच्या मुद्द्यावर सावरकर कुटुंबाने स्पष्ट भूमिका मांडली. 

रणजित सावरकर म्हणाले की, सावरकर यांचा वापर राजकीय फायद्यासाठी राहुल गांधींकडून केला जातोय. सावरकर हिंदुत्ववादी विचारांचे होते त्यांच्यावर आरोप केले तर मुस्लिमांची मते मिळतील असा राहुल गांधींचा समज आहे. एका राष्ट्रभक्ताच्या नावाचा अशाप्रकारे उपयोग होणे गंभीर आहे. काँग्रेससोबत असणारे पक्षही सावरकरांचा वापर करतायेत. बाळासाहेबांनी सावरकर स्मारकासाठी जागा उपलब्ध दिली. मणिशंकर अय्यर यांना जोडे मारले परंतु आज त्यांचा वारसा असणारे आज जी भूमिका घेतायेत ते दुर्दैवी आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच सावरकरांचा आदर बाळगणारे लोक आजही काँग्रेसमध्ये आहेत परंतु ते आवाज उचलत नाही. शिवसेनेत फूट पडल्याचे दु:ख आहे. शिवसेना जी बोटचेपी भूमिका घेत होती त्यावर अनेक शिवसैनिक नाराज होते. आज सावरकरांचा अपमान सहन करणार नाही अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली ती स्वागतार्ह आहे. परंतु ते स्वत: मुख्यमंत्री असताना काँग्रेसच्या शिदोरी मासिकात अत्यंत आक्षेपार्ह भाषेत सावरकरांवर लिखाण करण्यात आले. यानंतर मी त्यांना पत्र लिहिलं, भेटीची वेळ मागितली. मुख्यमंत्री असताना ते कारवाई करू शकले असते. तेव्हा ती मान्य केली. तुमच्याबाबत सावरकरांबद्दल प्रेम पण कृतीत उतरत नाही तोवर त्याला अर्थ नाही असा टोलाही रणजित सावरकर यांनी लगावला आहे. 

दरम्यान, सावरकरांच्या नावाचा राजकीय फायद्यासाठी दुरुपयोग होत आहे ते दुर्दैवी आहे. जर सावरकरांचा विरोध केला तर भाजपाचा विरोध होईल असा गैरसमज राहुल गांधींचा आहे. मुस्लीमांचे लांगुनचालून करण्याचं राजकारण काँग्रेस करतेय. जो कुणी सावरकरांचा अपमान झाल्यानंतर मैदानात उतरतो त्याला सावरकरवादी मी मानतो. संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्या मनात सावरकरांबद्दल प्रेम असू शकते तसे काँग्रेस नेत्यांच्या मनातही आहे. परंतु ते कृतीत दिसत नाही तोवर त्यांचं बोलणं व्यर्थ आहे. काँग्रेस त्यांच्या भूमिकेपासून दूर होत नाही असं रणजित सावरकर म्हणाले. 

शरद पवारांचे मत स्वागतार्ह 
विरोधकांच्या बैठकीत शरद पवारांनी सावरकरांबाबत जे मत व्यक्त केले ते स्वागतार्ह आहे. १९८९ मध्ये शरद पवारांनी जे भाषण केले होते ते अतिशय योग्य आहे. सावरकरांचा अपमान करू नका म्हणणं आणि त्यांच्या मित्रांकडून सातत्याने अपमानास्पद बोलणे हे सर्व नुराकुस्ती आहे. सावरकरांचा अपमान झाल्याबद्दल राहुल गांधींवर कारवाई होणे गरजेचे आहे. जर खरोखरच सावरकरांबद्दल आदर असेल तर राहुल गांधींकडून माफी मागायला हवं. सावरकरांनी माफी मागितली हे सिद्ध करणारे एकतरी पत्र दाखवावं असं आव्हान रणजित सावरकरांनी राहुल गांधींना केले. 

Web Title: Force Rahul Gandhi to apologize; Veer Savarkar's grandson's Ranjit Savarkar demand to Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.