शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

मुंबईतील फॉरेन्सिक लॅबसाठी केंद्राकडून मिळाले साडेचार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 5:38 AM

महिला व बालकांवरील सायबर गुन्ह्यांना लागणार लगाम; पोलिसांबरोबरच न्यायाधीशांनाही प्रशिक्षण

जमीर काझी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महिला व बालकांवरील वाढत्या सायबर गुन्ह्यांना प्रतिबंधासाठी प्रशिक्षण देणारी मुंबईत विशेष न्याय साहाय्यक प्रयोगशाळेची (फॉरेन्सिक लॅब) स्थापनेसाठी अखेर केंद्राकडून चार कोटी ५८ लाख ४० हजारांचा निधी राज्य सरकारच्या हवाली करण्यात आला. त्यासाठी सायबर विभागाच्या विशेष महानिरीक्षक महाराष्ट्राचे नियंत्रक (नोडल) अधिकारी म्हणून काम पाहतील. यासाठी राज्यातील एकूण ५,४०० जणांना प्रशिक्षण देण्यात येईल. ११६२ पोलीस ठाण्यांतील ११०० व्यक्ती, १०० महिला, प्रत्येकी ६०० न्यायाधीश व साहाय्यक सरकारी वकिलांचा यात समावेश असेल. तीन व पाच दिवसांचे शिबिर घेऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल.

केंद्राकडून मिळालेले अनुदान या वित्तीय वर्षात खर्च करण्यासाठी गृह विभागाने नुकतीच मान्यता दिली. त्यामुळे नरिमन पॉइंट येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे ही लॅब उभारण्याच्या कामाला लवकरच प्रारंभ केला जाईल, असे गृह विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले. फॉरेन्सिक लॅबमध्ये महिला व बालकांवरील आॅनलाइन गुन्हे आणि त्यातील तांत्रिक तपशील, तपासाची पद्धत, फौजदारी कलमे आणि शिक्षेचे स्वरूप याबाबत लॅबमध्ये संबंधित अधिकारी, वकील व न्यायाधीशांना मार्गदर्शन केले जाईल. तर या गुन्ह्याविरोधात महिला व बालकांमध्ये जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जातील.

गेल्या दोन-तीन वर्षांत महानगराबरोबरच ग्रामीण भागातही इंटरनेटच्या वापरात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्ह्याचा आलेख वाढत चालला असून तरुणी, महिला व बालकांना लक्ष्य केले जात आहे. त्याला आळा घालण्यासाठी प्रज्ज्वल नावाच्या स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामध्ये न्यायालयाने केंद्राला त्यावर तत्काळ प्रतिबंध घालण्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयाने प्रत्येक राज्यांना तातडीने त्यावर कार्यवाहीचे निर्देश दिले असून त्याचबरोबर या गुन्ह्यांचे गांभीर्य समजण्यासाठी त्यातील तांत्रिक बाबींची माहिती न्यायाधीशांनी करून घ्यावी, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने सर्व उच्च न्यायालयांना पत्र पाठवून केली आहे.देशभरात तक्रारीसाठी एकच वेबसाइटतरुणी, महिला, बालकांचे अश्लील एमएमएस, व्हिडीओ, चॅटिंग, रोमान्स स्कॅम, चाइल्ड पोर्नोग्राफी बनवून त्यांची बदनामी केली जाते किंवा खंडणी मागितली जाते. क्लिप व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आदी सोशल मीडियावर डाऊनलोड केल्या जातात. हे गुन्हे सायबर क्राइमअंतर्गत येतात. त्यामध्ये १८ वर्षांखालील युवती, बालिका असल्यास सायबर गुन्ह्याबरोबरच पॉक्सोअंतर्गत कारवाई केली जाणार आहे. महिला व बालकांवरील आॅनलाइन गुन्ह्यांबाबत पीडितेला देशभरात कोठूनही ू८ुी१ू१्रेी.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर तक्रार करता येते.