शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
2
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
4
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
5
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
6
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
7
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
8
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
9
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
10
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
11
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
12
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
13
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
14
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
15
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
16
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
17
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग
18
नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात
19
भीषण! गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; ११ महिन्यांच्या बाळासह १७ जणांचा मृत्यू
20
पाकिस्तानचे स्वप्न भंगले! रशिया आणि चीनलाही भारतासमोर झुकावे लागले

वन विभागाची ‘कासव बचाव’ मोहीम

By admin | Published: April 12, 2015 12:59 AM

दापोली वनपरिक्षेत्र उपविभागाने २०११ ते २०१५ या चार वर्षांच्या कालावधीत समुद्री कासव संवर्धन व संरक्षण केंद्राच्या माध्यमातून १६ हजार ६५१ अंडी गोळा केली

औषधोपचार : सात हजार पिल्लांना समुद्रात सोडले, कासवांचे संवर्धन व संरक्षण करण्याचा हेतूशिवाजी गोरे ल्ल दापोलीसमुद्रकिनाऱ्यावरील कासवांना वाचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाने पुढाकार घेतला आहे. दापोली वनपरिक्षेत्र उपविभागाने २०११ ते २०१५ या चार वर्षांच्या कालावधीत समुद्री कासव संवर्धन व संरक्षण केंद्राच्या माध्यमातून १६ हजार ६५१ अंडी गोळा केली असून, त्यातून बाहेर पडलेल्या ७ हजार ७ पिल्लांना सुखरूप समुद्राच्या पाण्यात सोडले आहे.निसर्गाच्या साखळीतील महत्त्वाचा घटक असलेले हे कासव अलीकडे मात्र दुष्टचक्रात अडकले आहे. कासवांच्या तस्करीचे प्रमाण काही वर्षांत वाढले आहे. त्याचबरोबर ग्लोबल वॉर्मिंगमुळे कासवांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वनविभागाने पुढाकार घेत कोकण किनारपट्टीवरील कासवांचे संवर्धन करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. वनविभागाने ग्रामस्थांच्या सहकार्याने समुद्री कासव संवर्धन व संरक्षण केंद्र उभे केले आहे.या मोहिमेला यशसुद्धा येऊ लागले आहे. पाच वर्षा$ंपूर्वी आंजर्ले व वेळास ही दोन संवर्धन केंद्रे होती. किनारपट्टीवरील ग्रामस्थांची मागणी वाढल्याने ही संख्या आता ९ झाली आहे. २००२ ते २०१०पर्यंत चिपळुणातील भाऊ काटदरे यांची सह्याद्री निसर्गमित्र व वनविभाग यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत होता. २०११पासून वनविभागाने ही मोहीम पूर्णपणे हाती घेतली आहे. समुद्रकिनारपट्टीवरील कासवाची अंडी शोधून एकत्र करून संवर्धन केंद्रातील घरट्यात ठेवली जातात. चार वर्षांत १६,६५१ अंडी सापडली. त्यापैकी ७००७ पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले.किनारपट्टीवरील कासव संवर्धन केंद्रामुळे लोकांमध्ये जागृती निर्माण झाली असून, अनेक कासवांचे संवर्धन होत आहे. यापुढे ही मोहीम अधिक गतिमान केली जाईल. स्थानिकांचा सकारात्मक सहभाग असल्यामुळेच ही मोहीम यशस्वी होतेय.- राजेंद्र पत्की, वनपरिक्षेत्र अधिकारीकासव संवर्धन व संरक्षण केंद्राचे काम केल्याने महिना ८ हजार रुपये मिळतात. सकाळी, संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारून अंडी गोळा करून संवर्धन केंद्रात ठेवतो.- अभिजित केळस्कर, आंजर्लेजन्माच्या ठिकाणीच घालतात अंडीकासवांचा अधिवास असलेल्या किनारपट्टीवर कासव अंडी घालण्यासाठी येत असल्याचे आढळले आहे. ज्या किनारपट्टीवरील घरट्यातून पिल्ले बाहेर पडली तेथे ते पिल्लू मोठेपणी अंडी घालण्यासाठी येत असल्याचा शोधही लागला आहे. दरवर्षी किंवा २ वर्षांतून एकदा किंवा ३ वर्षांतून दोनदा कासव अंडी घालते. भरती रेषेच्या बाहेर वाळूत खोलवर अंडी घातली जातात. त्यावर पुन्हा वाळू टाकून तो खड्डा बुजवून कासव समुद्रात निघून जाते.कोकणातील पहिलेकेंद्र वेळासला सन २००२पासून २०१४पर्यंत १० हजार कासवांच्या पिल्लांना सुखरूप समुद्राच्या पाण्यात सोडणारे वेळास हे राज्यातील पहिले गाव आहे. वेळास किनाऱ्यावर २००२ साली सह्याद्री निसर्गमित्र संस्थेने कोकणातील पहिले कासव संवर्धन व संरक्षण केंद्र उभारले. च्पावसाळ्यात किनाऱ्यावर येणाऱ्या जखमी कासवांवर उपचार करून ती सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी वनविभागाने वेळास व आंजर्ले किनारी हौद बांधले आहेत. जून ते सप्टेंबर या काळात जाळीत अडकून किंवा लाटांनी खडकावर आदळून जखमी कासव किनाऱ्यावर येऊन उपचाराअभावी मरून पडतात. आता मात्र जखमी कासवांवर उपचार होतील.