शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

कुणी कितीही आरोप केले तरी वनविभागाचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरुच राहणार :सुधीर मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2019 4:39 PM

वृक्ष तोडणाऱ्यांसाठी कायदा आहे. पण शिक्षेची तरतुद कमी आहे, त्यामुळे गांभीर्य नाही.

ठळक मुद्देपुण्यात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत ७ जूनला खरीप आढावा बैठकराजू शेट्टींबाबत भाजपाच निर्णय घेईल

पुणे : माजी मंत्री शोभा फडणवीस यांनी चंद्रपूरमध्ये वृक्षारोपणाची गरज नाही, वनविभागाचे नियोजन चुकले आहे असा आरोप केला आहे. मात्र, ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. धन आणि वन याला कसलीही मर्यादा नाही. त्या काही म्हणत असल्या तरी वन विभागाचा कार्यक्रम सुरूच राहील  असे मत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.  पुण्यात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते. मुनगंटीवार म्हणाले, देशी झाडांच्या लागवडीलाच महत्व दिले जात आहे. १५६ प्रजातींचे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. त्यात भूजल वाढवणारे, पक्षी वाढवणारे, पाऊस वाढवणारी अशा झाडांची नावे त्यात आहेत. २८ हजार ग्रामपंचायतींना पुस्तके वाटली, नर्सरींना दिले. तशी रोपे तयार होतात व तीच लावली जातात.वृक्ष तोडणाऱ्यांसाठी कायदा आहे. पण शिक्षेची तरतुद कमी आहे, त्यामुळे गांभीर्य नाही. म्हणून कायद्यात दुरुस्ती करत आहोत. एक समिती त्यासाठी स्थापन केली आहे. अभ्यास सुरू आहे.................खोत म्हणाले, मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत ७ जूनला खरीप आढावा बैठक होत आहे. या बैठकीत शेतकऱ्यांना कर्ज देण्याचा लक्षांक पुर्ण न करणाऱ्या बँकांची माहिती घेण्यात येईल. त्या बँकांवर कारवाई करण्याबाबत केंद्राला कळवण्यात येणार आहे.राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात गंगाधाम येथे ६ जूनला होत आहे. त्यात आम्ही ल़ोकसभेचा राजकीय आढावा घेऊ. विधानसभेला किती जागा मागायच्या ते त्यात ठरवू.बियाणांचा साठा पुरेसा आहे. खतेही आहेत. जिल्हानिहाय पथके स्थापन करणार, महसूलचीही मदत घेऊ. काळाबाजार करणाऱ्या गय करणार नाही. शेतकऱ्यांना पुर्ण मदत केली जाईल, असेही खोत म्हणाले. ........राजू शेट्टींबाबत भाजपाच निर्णय घेईल. मी मध्यस्थी करण्याइतका मोठा नाही. मी काय त्यांना मार्गदर्शन करणार, मीच त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालो आहे. त्यांनी भाजपाबरोबर यावे मी कसे सांगणार.आमच्या रयत क्रांतीचे विधानसभेसाठीचे ऊमेदवार कमळ चिन्हावरच लढणार. रयत क्रांती हा काही पक्ष नाही.- सदाभाऊ खोत 

टॅग्स :PuneपुणेSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारforest departmentवनविभाग