मुंबई : जनतेला पारदर्शक, वेगाने, कार्यक्षमतेने आणि विहित कालमर्यादेत लोकसेवा देण्याबाबत काढण्यात आलेल्या लोकसेवा हमी अध्यादेशाची अंमलबजावणी सुरू झाली असून, वन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या ४६ सेवांपैकी १० सेवा समाविष्ट करण्यात आल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.महाफॉरेस्ट या संकेतस्थळावरून आॅनलाइन पद्धतीने १० सेवांबाबतची अधिसूचना काढण्यात आली आहे. यातील तरतुदीनुसार तेंदूपाने व्यापारी, उत्पादक यांची नोंदणी करण्यासाठी अर्ज केल्यापासून १० दिवसांत सेवा पुरविणे प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे बुरूड कामगारांना बांबू पुरविण्यासाठी नोंदणी करणे, प्राण्यांच्या हल्ल्यामुळे पशु नुकसानभरपाई, व्यक्ती जखमी किंवा मृत झाल्यास आर्थिक साह्य, वन्यजीव क्षेत्रात फोटोग्राफीसाठी एका किंवा अनेक वनवृत्त स्तरावर परवानगी इ. सेवा आॅनलाइन अर्ज केल्यापासून १५ दिवसांत पुरविल्या जातील.
वन विभागाच्या १० सेवा आॅनलाइन - मुनगंटीवार
By admin | Published: October 06, 2015 3:38 AM