शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

Sharad Pawar, Girish Bapat: कोश्यारी असेपर्यंत विधान परिषद विसरा; शरद पवारांसमोरच गिरीश बापटांनी ठेवले ठाकरे सरकारच्या दुखण्यावर बोट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2022 12:31 PM

Sharad Pawar, Girish Bapat Speech in Pune: राष्ट्रवादीचे प्रवक्ता अंकुश काकडे यांच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखमालेचे उत्कर्ष प्रकाशनाने ‘हॅशटॅग पुणे’ हे पुस्तक तयार केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ललित साहित्य प्रकाशनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली असून, पुण्यासाठी व महाराष्ट्रासाठी ही चिंतेची बाब आहे. साहित्य आणि संस्कृतीच्या योगदानावर समाजाची उंची वाढत असते. भौतिक विकासापेक्षा समाज वैचारिक, सांस्कृतिक आणि बौद्धिकदृष्ट्या प्रगत होणे गरजेचे आहे. त्यासाठी साहित्य व्यवहार व वाचन संस्कृतीत वाढ होणे आवश्यक आहे, असे मत माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केले.

राष्ट्रवादीचे प्रवक्ता अंकुश काकडे यांच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखमालेचे उत्कर्ष प्रकाशनाने ‘हॅशटॅग पुणे’ हे पुस्तक तयार केले. या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभप्रसंगी पवार बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, वंदना चव्हाण, गिरीश बापट, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार आदी उपस्थित होते.पवार म्हणाले, राजकारणात मतभेद आणि वैचारिक भिन्नता असते. परंतु, त्या मतभेदांचे आणि मतभिन्नतेचे रूपांतर मनभेदामध्ये होता कामा नये. राजकीय नेतृत्व आणि कार्यकर्त्यांनी सुसंस्कृत भूमिका घेऊन आदर्श प्रस्थापित केला पाहिजे. 

लोकप्रतिनिधी झालो म्हणजे आपण सर्वसामान्यांपासून वेगळे झाल्याचे समजू नका, असे सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना गिरीश बापट यांनी मनोगतात सुनावले. तसेच अनेकांसाठी आताचे राजकारण हाच व्यवसाय झाला असल्याची खंतही व्यक्त केली.

कोश्यारी असेपर्यंत विधान परिषद विसरा...- अंकुश काकडे आणि माझे महापालिकेपासून मैत्रीपूर्ण संबंध. आमची राजकीय गाडी आता शेवटापर्यंत गेली. अंकुश काकडे यांचा पुढील राजकीय प्रवास शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली नक्की होईलच; परंतु काकडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधान परिषदेचे आमदारपद देऊ नये. -कारण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आहेत, तोपर्यंत विधान परिषदेवर आमदार निवडून जातील, याची खात्री देता येत नाही, असे खासदार गिरीश बापट यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला. 

मी बापट, तो पोपट...गिरीश बापट आणि अंकुश काकडे यांची मैत्री सर्वांनाच माहीत आहे. रविवारी अंकुश काकडे यांच्या पुस्तक प्रकाशन समारंभप्रसंगी खासदार गिरीश बापट यांनी काकडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पदर उलगडवून दाखवले. त्यावेळी बापट म्हणाले, मी बापट असलो तरी तो पोपट आहे. बोलतो चांगला आणि लिहितोही चांगला. हे हॅशटॅग पुस्तकावरून स्पष्ट होते, असे सांगत काकडे यांचे कौतुकही केले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारgirish bapatगिरीष बापटbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी