पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावी परीक्षेसाठी खासगीरीत्या फॉर्म क्रमांक १७ भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी या विद्यार्थ्यांना येत्या सोमवारपासून (दि. ३० जुलै) अर्ज करता येणार असून, अर्ज भरण्याची शेवटची मुदत २५ आॅगस्टपर्यंत आहे.दहावी व बारावीच्या फॉर्म क्रमांक १७ द्वारे विद्यार्थ्यांकडून आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. आॅनलाईन अर्ज करण्यासाठी दि. ३० जुलै ते २५ आॅगस्ट असा कालावधी राहणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज कागदपत्रांसह संपर्क केंद्र शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयात दि. २५ आॅगस्टपर्यंत सादर करावेत. शाळांनी दि. ३१ आॅगस्ट रोजी संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज जमा करावेत, असे आवाहन राज्य मंडळाचे प्रभारी सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.
सोमवारपासून भरता येणार १७ नंबर फॉर्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 1:48 AM