निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसकडून भाजपाला २ धक्के; माजी खासदार, आमदार पक्षप्रवेश करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 11:09 AM2024-09-13T11:09:34+5:302024-09-13T11:20:30+5:30

लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे कौल पाहून अनेकांनी सत्ताधारी भाजपातून विरोधी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Former BJP MP Bhaskar Rao Khatgaonkar, former MLA Gopal Aggarwal will join Congress | निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसकडून भाजपाला २ धक्के; माजी खासदार, आमदार पक्षप्रवेश करणार

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसकडून भाजपाला २ धक्के; माजी खासदार, आमदार पक्षप्रवेश करणार

मुंबई - ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला २ जबर धक्के बसत आहेत. माजी खासदार आणि आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं निश्चित केले आहे. गोंदिया इथले माजी आमदार गोपाल अग्रवाल आणि नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे लवकरच समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. खतगावकर हे अशोक चव्हाणांचे नातेवाईक असल्यानं त्यांच्यासाठीही हा धक्का मानला जात आहे. 

आज गोंदिया येथे काँग्रेसच्या कार्यक्रमात माजी आमदार गोपाल अग्रवाल यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. गोपाल अग्रवाल हे २ वेळा विधान परिषद आणि ३ वेळा विधानसभेचे आमदार राहिले आहेत. गोपाल अग्रवाल यांनी भाजपाला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारने गोंदिया जिल्ह्यातील कामे मार्गी न लावल्याचा आरोप गोपाल अग्रवाल यांनी केला आहे. अग्रवाल यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 

दुसरीकडे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा खासदार अशोक चव्हाण यांचे दाजी माजी खासदार भास्करराव खतगावकर हेदेखील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये भाजपाचा पराभव झाला. अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशानंतर भास्करराव खतगावकर, त्यांच्या सुनबाई मीनल खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह काँग्रेसच्या अनेकांनी भाजपाचे कमळ हाती घेतले तरीही नांदेडमध्ये काँग्रेस खासदार निवडून आले. 

नितीन गडकरींना पूर्ण ताकदीने प्रचारात उतरवल्यास विधानसभा निवडणुकीत भाजपाला बराच फायदा होईल, असं वाटतं का?

हो (1915 votes)
नाही (1316 votes)
सांगता येत नाही (187 votes)

Total Votes: 3418

VOTEBack to voteView Results

दरम्यान, अशोक चव्हाणांना खूप मोठी संधी भाजपात मिळेल. मोदी सरकार आल्यावर ते मंत्री होतील. त्यांच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याचा विकास होईल या हेतूने मी त्यांना पाठिंबा दिला. जी परिस्थिती भाजपात आज अशोक चव्हाणांची आहे त्यातून आमच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. मतदारसंघाच्या विकासासाठी मला मीनलच्या माध्यमातून लोकांचा विकास करायचा आहे. नायगावची विधानसभा मीनल खतगावकर यांनी लढवावी आणि रवींद्र चव्हाणांनी लोकसभा लढवावी असा निर्णय आमच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. जिल्ह्याचा विकास करण्याच्या दृष्टीने आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करतोय असं माजी खासदार भास्करराव खतगावकर यांनी सांगितले. 
 

Web Title: Former BJP MP Bhaskar Rao Khatgaonkar, former MLA Gopal Aggarwal will join Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.