मुंबई : आरटीआय कार्यकर्ते भूपेंद्र वीरा यांच्या हत्येप्रकरणी वाकोला पोलिसांनी सोमवारी काँग्रेसचा माजी नगरसेवक रझाक खान आणि त्याचा मुलगा अमजद याला अटक केली. वीरा यांच्या तक्रारींमुळे खानचे लाखोंचे नुकसान होणार होते. याच रागात त्याने वीरा यांचा काटा काढल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.वीरा हे राहत असलेल्या या कम्पाऊंडमध्ये खानचे जवळपास दीडशे अनधिकृत गाळे होते. या प्रत्येक गाळ्यातून त्याला २० ते २५ हजार रुपये दर महिना भाडे स्वरूपात येत होते. मात्र या अनधिकृत कम्पाऊंडची वीरा यांनी तक्रार केली होती. त्यामुळे हे सर्व गाळे तोडण्याचे आदेश आठ दिवसांपूर्वी पालिकेकडून देण्यात आले. त्यानुसार लवकरच या गाळ्यांवर पालिकेचा हातोडा पडणार होता. ज्यात स्वत: वीरा यांचेही घर तुटणार होते. वीरा यांच्यामुळे आपल्याला इतके मोठे नुकसान होणार ही बाब खानला सहन झाली नाही. त्यामुळेच त्याने वीरा यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
वीरा हत्येप्रकरणी माजी नगरसेवकास अटक
By admin | Published: October 18, 2016 5:43 AM