‘दादां’च्या ‘भाईं’ना शुभेच्छा; फडणवीसांचंही केलं अभिनंदन; म्हणाले, “हे नवीन सरकार…”

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 09:04 PM2022-06-30T21:04:58+5:302022-06-30T21:05:45+5:30

गुरूवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी झाले.

former deputy cm ajit pawar congratulate devendra fadnavis eknath shinde maharashtra politics oath ceremony | ‘दादां’च्या ‘भाईं’ना शुभेच्छा; फडणवीसांचंही केलं अभिनंदन; म्हणाले, “हे नवीन सरकार…”

‘दादां’च्या ‘भाईं’ना शुभेच्छा; फडणवीसांचंही केलं अभिनंदन; म्हणाले, “हे नवीन सरकार…”

googlenewsNext

काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी भूमिका घेत शिवसेनेच्या आमदारांनी महाविकास आघाडीपासून फारकत घेतली. त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरूवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी झाले. राज्यात स्थापन झालेल्या माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रिपद भूषवणारे देवेंद्र फडणवीस यांचं मनःपूर्वक अभिनंदन! हे नवीन सरकार राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासहित राज्याच्या विकासाचा गाडा देखील वेगानं पुढे हाकतील, अशा सदिच्छा व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली.


यापूर्वी काय म्हणाले होते शिंदे? 
“जो विश्वास भाजपनं आमच्या ५० आमदारांवर दाखवलाय तो सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करू. आम्ही त्या ५० आमदारांच्या जोरावर ही लढाई लढलोय त्यांचे आभार मानतो. ज्या ५० लोकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलाय तो कदापि तोडणार नाही. जो यापूर्वी त्यांना अनुभव आला तोही त्यांना येऊ देणार नाही याची खात्री करेन,” असं एकनाथ शिंदे म्हणाले. राज्याला पुढे नेण्यासाठी, विकासाठी कायम प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

Web Title: former deputy cm ajit pawar congratulate devendra fadnavis eknath shinde maharashtra politics oath ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.