काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी भूमिका घेत शिवसेनेच्या आमदारांनी महाविकास आघाडीपासून फारकत घेतली. त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरूवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी झाले. राज्यात स्थापन झालेल्या माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रिपद भूषवणारे देवेंद्र फडणवीस यांचं मनःपूर्वक अभिनंदन! हे नवीन सरकार राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासहित राज्याच्या विकासाचा गाडा देखील वेगानं पुढे हाकतील, अशा सदिच्छा व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली.