“त्यावेळी आम्ही शिकवलेलं वाया गेलं नाही, केसरकर भारी प्रवक्ते झाले;” दादांची तुफान फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 01:02 PM2022-07-03T13:02:07+5:302022-07-03T13:02:22+5:30

सभागृहात बोलताना अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली. त्यांच्या भाषणादरम्यान एकच हशा पिकला होता.

former deputy cm ajit pawar speaks on shiv sena bjp new government maharashtra deepak kesarkar spoke person vidhan sabha | “त्यावेळी आम्ही शिकवलेलं वाया गेलं नाही, केसरकर भारी प्रवक्ते झाले;” दादांची तुफान फटकेबाजी

“त्यावेळी आम्ही शिकवलेलं वाया गेलं नाही, केसरकर भारी प्रवक्ते झाले;” दादांची तुफान फटकेबाजी

Next

रविवारी विधानसभेत महाविकास आघाडीला मोठा धक्का लागला असून राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्रस्तावाच्या बाजूनं १६४ मतं पडली. तर प्रस्तावाच्या विरोधात १०७ जणांनी मतदान केलं. तर ३ जण मतदानादरम्यान तटस्थ राहिले. यानंतर माजी उपमुख्यंत्री अजित पवरा यांनी अध्यक्षांचे आभार मानत सभागृहात तुफान फटकेबाजी केली.

“समोर बसलेल्यांनी यापूर्वी भिंती रंगवल्या, पोस्टर लावले, आंदोलनं केली, निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळखतात. मी जेव्हा पाहतो तेव्हा मूळचे भाजपचे मान्यवर कमी आणि आमच्याकडून गेलेले मान्यवर जास्त पाहायला मिळतात. त्यांना पाहून मला मूळ भाजपच्या मान्यवरांचं वाईट वाटतं. पदांवर बसलेले मान्यवर मूळ मान्यवरांना सारून बाजूला बसले आहेत,” असं म्हणत अजित पवारांनी टोला लगावला.

पहिली लाईन पाहिली तरी तुम्हाला कल्पना येईल. गणेश नाईक, बबनराव पाचपुते, राधाकृष्ण विखे-पाटील, दीपक केसरकर. दीपक केसरकर तर आता काय चांगले प्रवक्ते झालेत. त्यावेळी आम्ही शिकवलेलं कुठे वाया गेलं नाही, असं म्हणत त्यांनी तुफान फटकेबाजी केली. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

Web Title: former deputy cm ajit pawar speaks on shiv sena bjp new government maharashtra deepak kesarkar spoke person vidhan sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.