माजी न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांचं पुण्यात निधन, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 11:52 AM2021-02-15T11:52:43+5:302021-02-15T11:54:12+5:30

P. B. Sawant यांनी मुंबई विद्यापीठातून घेतली होती कायद्याची पदवी

Former Justice PB Sawant passed away in Pune at the age of 91 | माजी न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांचं पुण्यात निधन, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

माजी न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांचं पुण्यात निधन, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Next
ठळक मुद्देते ९१ वर्षांचे होते. P. B. Sawant यांनी मुंबई विद्यापीठातून घेतली होती कायद्याची पदवी

माजी न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांचं पुण्यात निधन झालं. त्यांनी आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. ते ९१ वर्षांचे होते. पुण्यातील बाणेर येथे मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पुण्यातील पहिली एल्गार परिषद ही पी.बी.सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती. 

पी.बी.सावंत यांचं आज (सोमवार) सकाळी साडेनऊ वाजता त्यांच्या पुण्यातील राहत्या घरी निधन झालं. अतिशय कडक शिस्तीचे न्यायमूर्ती अशी सावंत यांची ओळख होती. ३० जून १९३० रोजी पी.बी. सावंत यांचा जन्म झाला. त्यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली. त्यानंतर सावंत यांनी उच्च न्यायालयात आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सराव सुरू केला. १९७३ मध्ये सावंत यांची उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी १९८२ मध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताची चौकशीही केली. त्यानंतर १९८९ मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली. १९९५ मध्ये ते सेवानिवृत्त झाले.

२००३ मध्ये राज्य सरकारमधील तत्कालिन मंत्री नवाब मलिक, पद्मसिंह पाटील, सुरेश जैन आणि विजयकुमार गावित यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. या आरोपांच्या चौकशीसाठी एक समितीही स्थापन करण्यात आली होती. पी.बी. सावंत हे त्या समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी २३ फेब्रुवारी २००५ मध्ये आपला अहवाल सादर केला होता. त्यात नवाब मलिक, पद्मसिंह पाचील आणि सुरेश जैन यांच्या आरोप ठेवण्यात आले होते. तर विजयकुमार गावित हे दोषमुक्त असल्याचं सांगण्यात आलं होतं. यानंतर नवाब मलिक आणि सुरेश जैन यांनी राजीनामा दिला होता.

न्यायामूर्ती पी. बी. सावंत सर, आमच्या आठवणीत तुम्ही नेहमी असाल. नवीन वकिलांना सामाजिक न्यायासाठीचा दृष्टीकोन समजावून सांगायला आमच्या सोबत नेहमी मार्गदर्शक म्हणून तुम्ही असायचे. न्यायिक सुधारणांसाठी आग्रही मत मांडणारे, आरक्षण विषयांवरील महत्त्वाच्या निर्णयांमधील एक सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती म्हणून कधीही फोन केला की त्वरित कायद्याचा अनव्यार्थ बरोबर की चूक याबद्दल सांगणारा न्यायस्तंभ आता आमच्यात नाही. 
असीम सरोदे, मानवाधिकार कार्यकर्ते

Web Title: Former Justice PB Sawant passed away in Pune at the age of 91

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.