नाशिक - मोबाइलचा व्हीव्हीआयपी क्रमांक देतो, असे सांगून राज्याचे माजी मंत्री बबनराव घोलप यांना एक लाख ३३ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.मोबाइलवर आलेल्या एसएमएसनुसार घोलप यांनी एकाशी संपर्क साधला. त्याने व्हीव्हीआयपी सिमकार्डबाबत माहिती देत त्यांचा विश्वास संपादन केला. ८४४४४४४४४४ क्रमांक खरेदी केल्यास आयफोन मोफत देण्याचे आमिष दाखविले.घोलप यांनी सुरुवातीला ५० हजार रुपये भरले; मात्र टप्प्याटप्प्याने त्यांच्याकडून तब्बल एक लाख ३३ हजार रुपये उकळण्यात आले.मात्र संपूर्ण पैसे भरूनही कुठल्याही प्रकारे वस्तू व सेवा पुरविली नसल्याचे लक्षात आल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी सायबर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दाखल केला.नोव्हेंबरमध्ये फसवणूक१ ते २० नोव्हेंबर २०१७ या कालावधीत वेळोवेळी भारतीय एअरटेल एंटरप्रायजेस तलवाररोड शाखा, जयपूर; संतोष राठोड कोटक महिंद्र शाखा, जयपूर या नावांनी असलेल्या बॅँक खात्यांमध्ये घोलप यांनी रक्कम जमा केली. सुरुवातीला ३० हजार रुपये एंटरप्रायजेस खात्यावर त्यांनी जमा केले त्यानंतर राठोड नावाच्या भामट्याच्या खात्यावर घोलप यांनी दोन वेळा व्यवहार करीत ५४ हजार व २९ हजार १२६ रुपये जमा केल्याची माहिती नाशिकरोड पोलिसांनी दिली आहे. घोलप यांनी ज्या मोबाइल क्रमांकांशी संपर्क साधला होता, ते सर्व आता बंद आहेत.
माजी मंत्री घोलप यांना एक लाखांना गंडा, व्हीव्हीआयपी मोबाइल क्रमांकाची भुरळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 4:26 AM