औरंगाबाद : सुसंस्कृतपणाचा आदर्श असलेले आणि देशाची प्रतिष्ठा वाढविणा-यांमध्ये माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव घेतले जाते, अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी डॉ. सिंग यांच्या कार्याचा गौरव केला.‘पद्मविभूषण शरद पवार - ए ग्रेट इनिग्मा’ या चरित्रग्रंथाचे डॉ. सिंग यांच्या हस्ते शनिवारी प्रकाशन झाले. डॉ. सिंग म्हणाले, बारामती मॉडेल देश-विदेशात प्रसिद्ध आहे. लातूर जिल्ह्यातील भूकंप, मुंबई बॉम्बस्फोटच्या वेळी, तसेच मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या वेळी पवार यांनी परिस्थिती कौशल्याने हाताळली.ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते धीरूभाई मेहता, पर्यावरणतज्ज्ञ अफरोज अहमद, ‘एमजीएम’चे चेअरमन कमलकिशोर कदम, सचिव अंकुशराव कदम, प्राचार्य प्रताप बोराडे आणि शेषराव चव्हाण यांची उपस्थिती होती.डॉ़ सिंग हे पवार यांची स्तुती करत असताना उपस्थितांचीही दाद मिळत होती़ उपस्थितीतांमध्येही पवार यांच्या कारकिर्दीची चर्चा चांगलीच रंगली होती़
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देशाची प्रतिष्ठा वाढविली - शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 3:27 AM