खांडज : ऐतिहासिक गडकिल्ले यांची माहिती मिळावी व विद्यार्थी कलागुणांना वाव मिळावा, यासाठी खांडज (ता. बारामती) येथे ज्ञानेश्वर सोरटे या नुकतेच मिलिटरी सेवा निवृत्त झालेल्या देशभक्तांनी ‘किल्ले बनवा, किल्ले सजावट’ स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये ५० स्पर्धकांनी भाग घेतला. या स्पर्धेत रायगड, प्रतापगड, सिंहगड, शिवनेरी, मुरूड, जंजिरा, अजिंक्यतारा या किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या होत्या. किल्ला बांधणी, सजावट, पर्यावरण संदेश, ऐतिहासिक माहिती, स्वछता आदी बाबींना गुण देऊन प्रथम ३ क्रमांक काढण्यात आले. प्रथम क्रमांक १ हजार रुपये, द्वितीय क्रमांक ७०० रुपये, तृतीय क्रमांक ५०० रुपये पारितोषिक व सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना ऐतिहासिक गडकिल्ले माहिती मिळावी, हा हेतू असल्याचे ज्ञानेश्वर सोरटे यांनी सांगितले. परीक्षक म्हणून दीपक देशमुख व ज्ञानेश्वर कर्णे यांनी काम पाहिले.
खांडजला किल्ले सजावट स्पर्धा
By admin | Published: November 05, 2016 1:17 AM