शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खांबाटकी बोगद्याजवळ चार वाहनांचा अपघात, 14 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 08:50 IST

बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खांबाटकी बोगदाजवळ अपघात झाला आहे.

ठळक मुद्देबंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खांबाटकी बोगदाजवळ अपघात झाला आहे. बोगदा पार करून पुढे जाणाऱ्या खासगी बसला मागून वेगाने येणाऱ्या दूधाच्या टँकरने धडक दिल्याने हा अपघात झाला.

सातारा: पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खांबाटकी बोगदाजवळ अपघात झाला आहे. बोगदा पार करून पुढे जाणाऱ्या खासगी बसला मागून वेगाने येणाऱ्या दूधाच्या टँकरने धडक दिल्याने हा अपघात झाला. टँकरची धडक बसला बसल्याने त्या बसची धडक त्याच्या पुढे असलेल्या ट्रकला बसली नंतर तो ट्रक रांगेत असलेल्या दुसऱ्या ट्रकवर धडकून हा अपघात झाला. या अपघातात नागपूरहून सहलीसाठी आलेले 12 विद्यार्थी व बस आणि टॅकरचालक जखमी झाले . एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारार्थ पुणे येथे हलवण्यात आलं आहे . 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, खांबाटकी बोगदा ते धोम -बलकवडी कालवा दरम्यान बुधवारी मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास चार वाहनांचा अपघात झाला . खांबाटकी बोगदा ओलांडून पुणे बाजूकडे जाताना उतारावर काही वाहने थांबली होती . समोर वाहने थांबल्याने लक्झरी बसचालकाने गाडी थांबवली . त्याचवेळी पाठीमागून भरधाव आलेला दूध टँकरला ब्रेक न लागल्याने बसच्या पाठीमागील बाजूवर आदळून डाव्या बाजूच्या कठडयावर धडकला . टँकरच्या जोरदार धडकेने बस पुढे उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली . त्यामुळे ट्रक दुसऱ्या ट्रकला धडकला . या अपघातामुळे रस्त्यावर काचा , बसमधील विद्यार्थ्यांच्या बॅगा, वस्तू विखूरल्या. दोन्ही वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूला गेल्याने वाहतूक ठप्प झाली . 

घटनेची माहिती मिळताच शिरवळचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, खंडाल्याचे सहायक पोलीस निरीक्षक स्मीता पाटील, सहायक पोलीस निरीक्षक मोहन कदम , शिरवळचे सहायक पोलीस निरीक्षक सुनिल पवार घटनास्थळी दाखल झाले . जखमी विद्यार्थ्यांना उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं . रस्त्यावर विखुरलेल्या काचा व इतर साहित्य बाजूला काढून रस्ता खुला केला. अपघातग्रस्त बस क्रेनच्या सहाय्याने बाजूला घेतल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली . 

भाविक अशोक बांते (वय १५, रा. ओम नगर सकरदरा नागपूर), कार्तिक किशोर ठाकरे (१५),  आनिक्षा विजय घायवाट ( २०),  संगिता गजानन पारतवार (६०), कमलाबाई तोलाराम सुतोणी  (६५, र. पारतवार), अग्नी अनिल राऊत ( २०), देवेंद्र रमेश चौधरी ( २१), बस क्लिनर चुन्नाराम सलामी (२८,  मध्यप्रदेश), मयुरी काशीनाथ लोनगाडगे (२०), प्रणय अरुण शिवणकर (१५), हर्षल लीलाधर बांते (१५), रागीनी विनोद देवडे ( २०), सतिश सुभाष शेटे (३२, नवे पारगांव, हातकणंगले कोल्हापूर),  बसचालक  बाळकृष्ण रामनरेश विश्वकर्मा (४९)  अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावं आहेत. यातील भाविकची प्रकृती गंभीर आहे.

टॅग्स :Accidentअपघातhighwayमहामार्ग