शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

राज्यातील चारशे धरणांना धोका!

By admin | Published: April 15, 2015 2:24 AM

धरणांच्या मजबुतीसंदर्भात ‘डॅम सेफ्टी आॅर्गनायझेशन’ या शासकीय संस्थेने केलेल्या तपासणीत राज्यातील तब्बल ४०० धरणं नापास झाली आहेत.

तपासणीत आढळल्या गंभीर त्रुटी : सिमेंटची धरणं नाजूकविश्वास खोड - पुणेधरणांच्या मजबुतीसंदर्भात ‘डॅम सेफ्टी आॅर्गनायझेशन’ या शासकीय संस्थेने केलेल्या तपासणीत राज्यातील तब्बल ४०० धरणं नापास झाली आहेत. या धरणांच्या सुरक्षिततेबाबत अनियमितता आणि गंभीर उणिवा आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे, मातीच्या धरणांपेक्षा सिमेंटची धरणे अधिक नाजूक असून, काही धरणांना धोका निर्माण होण्याची भीती सिंचन क्षेत्रातील तज्ज्ञांमध्ये व्यक्त होत आहे. राज्य सरकारच्या ‘मेरी’अंतर्गत असलेल्या धरण सुरक्षाविषयक विभागाने (डॅम सेफ्टी आॅर्गनायझेशन) राज्यातील एकूण १२३१ प्रकल्पांपैकी १२२६ प्रकल्पांची तपासणी केली असता भराव खचणे, धरणतळाला भेगा पडणे, धरणतळातून गळती, सांडव्याच्या परिसराची धूप होणे, दगडांचा थर खचणे, अशा गंभीर त्रुटी जवळपास ४०० धरणांमध्ये आढळून आल्या आहेत. पुणे विभागातील टेमघर आणि वरसगाव या दगडी धरणांची अशी नाजूक स्थिती असून, विशेषत: टेमघर प्रकल्पास मोठा धोका संभवू शकतो. सिमेंटच्या धरणांची तूट-फूट असणे अधिक धोक्याचे आहे. सिमेंटचे कण या फुटीतून बाहेर पडत असल्याने दीर्घकाळाने मोठा धोका उद्भवू शकतो, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, या धरणांच्या सुखरूपतेसाठी त्या विभागाचे अधिकारी दुरुस्तीसाठी अंदाजपत्रके शासनाला पाठवितात, मात्र दुरुस्तीसाठी निधीच उपलब्ध केला जात नाही. धरणाच्या पाण्यातून वसूल होणाऱ्या पाणीपट्टीच्या तुलनेत देखभाल दुरुस्तीसाठी निधी मिळत नसल्याने या धरणांची अवस्था वाईट आहे.डॅम सेफ्टी आॅर्गनायझेशन च्पानशेत धरणफुटीसारखे प्रकार होऊ नयेत म्हणून केंद्र सरकारने १९७९मध्ये डॅम सेफ्टी डायरेक्टरेटची स्थापना केली. च्राज्य शासनाने १९८०मध्ये नाशिक येथे मेरी संस्थेच्या नियंत्रणाखाली डॅम इन्स्पेक्शन अ‍ॅण्ड सेफ्टी सर्व्हिसेस या संस्थेची स्थापना करून धरण प्रकल्पांच्या सुरक्षिततेची तपासणी सुरू केली. च्१९८५मध्ये या संस्थेला ‘डॅम सेफ्टी आॅर्गनायझेशन’ असे नाव देण्यात आले. धरण नियंत्रण, तपासणी मोहीम, धरणांच्या आरोग्य तपासणीची स्थिती, चाचणी तपासणी आदी कामे या संस्थेतर्फे चालतात.लक्ष दिले जात नाही वर्षानुवर्षे त्रुटींचे निराकरण होत नाही, गांभीर्याने लक्ष दिले जात नाही ही वस्तुस्थिती आहे. एखादे काम का केले नाही हे विचारणारी व्यवस्था, यंत्रणा आपल्या राज्यात नाही. आपण प्रकल्प उभारण्यात जेवढा उत्साह दाखवितो त्याच्या एक टक्काही त्याची देखभाल करण्याकडे, त्याचे आयुष्य वाढविण्याकडे देत नाही.- डॉ. दि. मा. मोरे, (सिंचन आयोगाचे माजी सचिव )मुख्य सचिवच अनभिज्ञजलसंपदा विभागाच्या मुख्य सचिव मालन शंकर यांना याबाबत विचारले असता त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात धरणांमध्ये त्रुटी नसल्याचा दावा करून कोणती कार्यवाही झाली आहे याची माहिती सांगण्यास नकार दिला.विहार तलावाकडे जाण्यास १९९२-९३ सालच्या दंगलीनंतर उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. अतिरेक्यांपासून तलावाला धोका असल्याच्या चर्चांनाही त्या वेळी उधाण आले होते. परिणामी, तलाव परिसरात सर्वसामान्य पर्यटकांना प्रवेश दिला जात नाही. केवळ तलावाच्या पलीकडे राहणाऱ्या साई-बांगोडा गावातील लोकांना दुसरा मार्ग नसल्याने या ठिकाणी ये-जा करण्यास परवानगी आहे.