ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - मुंबईला गुजरातशी जोडणारा वर्सोवा पूल आजपासून पुढील चार दिवस बंद असणार आहे. दुरुस्तीच्या कामांसाठी हा पूल पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून 17 मे पर्यंत म्हणजेच 4 दिवसांत पुलावरील पूर्ण वाहतूक बंद करण्यात आली आहे.
काही महिन्यांपूर्वी या पुलाला तडे गेल्याचं निदर्शनास आलं होतं तरीही त्यावरून वाहतूक सुरू होती. अखेर आता दुरुस्तीच्या कामांसाठी चार दिवस हा पूल पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर आजपासून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो.
यापूर्वी डिसेंबरमध्येही या पुलाचं काम केलं होतं. मात्र काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. डिसेंबरमध्येही वाहतूक कोंडीचा त्रास झाला होता. अजूनही काम चालूच आहे. जुना पूल बंद करण्यात आला असला तरी बाजुच्या नवीन पुलावरुन वाहतूक सुरू राहिल.