शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

अवकाळीचे चार बळी

By admin | Published: March 03, 2016 4:47 AM

राज्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरूच असून या पावसामुळे चार बळी गेले आहेत. पाथर्डी (अहमदनगर) तालुक्यात जवखेडे खालसा येथील प्रीती जाधव (२८) व डमाळवाडी येथील भारत डमाळे

पुणे : राज्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरूच असून या पावसामुळे चार बळी गेले आहेत. पाथर्डी (अहमदनगर) तालुक्यात जवखेडे खालसा येथील प्रीती जाधव (२८) व डमाळवाडी येथील भारत डमाळे (१३) हा शाळकरी मुलगा असे दोघे जण वीज पडून बुधवारी ठार झाले. बीड जिल्ह्यातील दादेगाव येथे वादळामुळे विजेची तार अंगावर पडून तानाजी बंडाले (२८) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर शिरुर कासार तालुक्यातील शिरपूर धुमाळ येथे बुधवारी सायंकाळी वीज अंगावर पडून ज्योती बहीर (२२) ही महिला ठार झाली. गेल्या २४ तासांत मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे.त्यात मध्य महाराष्ट्रात भोर, सिन्नर (२० मिमी), दहिवडी, जावली मेढा, खंडाळा-बावडा, निफाड, फलटण, शाहूवडी, वडगाव मावळ (१० मिमी), मराठवाड्यात कंधार (२० मिमी), हिंगोली, जाफराबाद, मुखेड, नांदेड (१० मिमी), विदर्भात मानोरा (४० मिमी), मंगरूळपीर, रिसोड (३० मिमी), बुलडाणा, लोणार (२० मिमी), दारव्हा, महागाव, उमरखेडला (१० मिमी) पावसाची नोंद झाली. दरम्यान, पुढील ४८ तासांत मुंबईत मेघगर्जनेसह पाऊस पडेल आणि उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी गडगडाटी वावटळ येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)> पाऊस/गारपिटीचा अंदाज३-४ मार्च : मुंबई, उत्तर मध्य महाराष्ट्र, कोकण, पुणे, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या तुरळक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल.५ मार्च : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या तुरळक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल.६ मार्च : मराठवाडा आणि विदर्भाच्या तुरळक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल.पाऊस/गारपिटीचा इशारा३ मार्च : उत्तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या तुरळक भागात गारपीट होईल.४ मार्च : उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकणी गारपीट होईल.