ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. २४ - वनखात्यात नोकरी लावण्याचे अमिष दाखवून एकाच गवातील चार युवकाना फसविले. याप्रकरणी संदीप शिवराम रासकर (रा. बारामती, जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसानी सांगितलेली माहिती अशी की, संदीप रासकर याने गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये पिराची कुरोलि (ता. पंढरपूर) येथे राहणारे कुमार रामचद्र लामकाने व त्याचे मित्र महादेव कौलगे, मंगेशराव लोकरे यांच्याशी ओळख करुन घेतली. मी वनखत्यात अधिकारी असून माझी मुंबईत मंत्रालयात ओळख आहे त्या जोरावर तुम्हाला वनखात्यात नोकरी शिपायाची नोकरी लावून देतो असे सांगितले.
त्यासाठी लामकाने यांच्याकडून ६८ हजार रुपये, महादेव कौलगे यांच्याकडून एक लाख तीन हजार रुपये, गोपाळ कौलगे यांच्याकडून ९० हजार, मंगेश लोकरे यांच्याकडून ७० हजार रुपये असा तीन लाख ३१ हजार रुपये घेतले. मात्र पैसे घेतल्यानंतर तो भेटण्यास व बोलण्यास टाळाटाळ करायला लागला अखेर आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यावर लामकाने यानी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.