शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

चार उपाधीक्षकांच्या बदल्या

By admin | Published: August 25, 2015 2:47 AM

पोलीस अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्याच्या कालावधी उलटून गेला असलातरी गृह विभागाकडून वरिष्ट अधिकाऱ्यांच्या टप्याटप्याने व सोयीनुसार बदल्या

मुंबई : पोलीस अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्याच्या कालावधी उलटून गेला असलातरी गृह विभागाकडून वरिष्ट अधिकाऱ्यांच्या टप्याटप्याने व सोयीनुसार बदल्या करण्याचे धोरण सुरु राहिले आहे. ठाणे पोलीस मुख्यालयायातील उपायुक्त सुनील लोखंडे यांच्यासह अन्य चार उपअधीक्षकांच्या विनंतीवरुन विशेष बाब म्हणून सध्याच्या ठिकाणाहून अन्यत्र बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या सर्वसाधारण बदल्या मे/जून मध्ये केल्या जातात. मात्र पाच अधिकाऱ्यांनी विनंती केल्याने त्यांची बदली करण्यात आल्याचे गृहविभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यासाठी राज्य पोलीस अधिनियम १९५१च्या कलम २२ (न)(२) अन्वये हा निर्णय घेण्यात आला. उपायुक्त लोखंडे यांची अमरावती (ग्रामीण) विभागात अप्पर अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर उपअधीक्षक सर्वश्री (कंसात कोठून-कोठे): नरेश मेघराजानी (मनमाड- वाशिम), रामेश्वर सुपले ( पोलीस अ‍ॅकडमी नाशिक-मुंबई), राहुल खाडे ( पेण- मनमाड) व बजरंग बनसोडे (माहूर-अहमदनगर शहर) बदली करण्यात आलेली आहे. यापैकी खाडे व बनसोडे यांची काही महिन्यापूर्वी बदली झालेल्या ठिकाणी ते हजर झालेले नाहीत. त्यांनी अन्यत्र बदली करुन घेतली आहे. (प्रतिनिधी)राज्यात ७६३ पोलीस उपनिरीक्षकांच्या नियुक्त्यागेली वर्षभर राज्यभरातील विविध पोलीस आयुक्तालय व अधीक्षक कार्यालयाच्या अधिपत्याखाली प्रत्यक्ष प्रशिक्षण घेत असलेल्या ७६३ परिविक्षाधीन उपनिरीक्षकांच्या विविध ठिकाणी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.त्यामध्ये सर्वाधिक २३० जणांना मुंबई आयुक्तालयातर्गंत नेमण्यात आलेले आहे. पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी नुकताच त्याबाबतचा आदेश जारी केला असून त्यांना नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त करण्याची सूचना घटकप्रमुखांना केली आहे.राज्य लोकसेवा आयोगाच्यावतीने (एमपीएससी) सरळ सेवा भरतीद्वारे उपनिरीक्षक पदाची परीक्षा उर्त्तीण ७६३ उमेदवारांनी एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण नाशिक पोलीस अकादमीमध्ये केले. ११० क्रमांकाच्या या तुकडीतील उमेदवारांची गेल्यावर्षी आठ आॅगस्टला राज्यभरातील विविध पोलीस घटकांमध्ये एक वर्षासाठी प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आलेली होती. त्यांचा हा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांना नियमित स्वरुपाच्या नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत. बहुतांश अधिकाऱ्यांना प्रशिक्षणाच्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. ७६३ उपनिरीक्षकांपैकी सर्वाधिक २३०जण मुंबई पोलीस दलाला मिळालेले आहेत. त्यांच्या नियुक्त्या कायमस्वरुपी केल्याने सध्या कार्यरत असलेल्या पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण काही प्रमाणात कमी होणार आहे.