शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
3
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत?
5
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
6
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
7
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
8
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
9
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
10
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
11
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात
12
शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: जयदेव आपटेंच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब
13
बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन
14
यूजीसी नेट परीक्षा जानेवारीत होणार; १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
15
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
16
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
17
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
18
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
19
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
20
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?

एकाला वाचवताना गेला चौघांचा जीव; रशियात महाराष्ट्रातील चार विद्यार्थ्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2024 7:06 PM

महाराष्ट्रातील चार विद्यार्थ्यांचा रशियाच बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

रशियात भारतातील चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रशियातील सेंट पीटर्सबर्गजवळील एका नदीत चार भारतीय विद्यार्थी बुडाले. तिथल्या प्रशासनाने एक मृतदेह बाहेर काढला असून उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे चारही विद्यार्थी महाराष्ट्रातील होते आणि वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी तिथे गेले होते. मात्र चौघांच्याही मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

जळगावमधील चार विद्यार्थी रशियामधील यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेले होते. मात्र मंगळावीर तिथे घडलेल्या एका अपघातात चौघांचाही बुडून मृत्यू झाला. मृतांपैकी एकाचा मृतदेह सापडला असून तिघांच्या मृतदेहांचा शोध सुरु आहे. चौघेही जळगाव जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.

जिया फिरोज पिंजारी, जीशान अशपाक पिंजारी, गुलामगज मोहम्मद याकूब मलिक आणि हर्षल अनंतराव देसले असे मृत्यू झालेल्या चौघांची नावे आहेत. तरनिशा भूपेश सोनवणे हिला वाचवण्यात यश आलं आहे. चौघांपैकी हर्षल देसले या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला असून इतर तिघे विद्यार्थी अद्याप बेपत्ता असल्याची माहिती जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. जिया आणि जिशान हे अमळनेर येथील रहिवासी होते. तर गुलामगज मोहम्मद याकूब यावल तर हर्षल भडगाव येथील रहिवासी होता.

सेंट पीटर्सबर्गच्या जवळील एका नदीच्या काठावर हे सर्व विद्यार्थी ४ जून रोजी संध्याकाळच्या सुमारास फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी एकजण नदीमध्ये उतरला होता. तो बुडायला लागल्याने इतर मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र या घटनेमध्ये चौघांचाही बुडून मृत्यू झाला. तर निशा सोनवणे हिला वाचवण्यात यश आल्याची माहिती भारतीय दूतावासाच्या माध्यमातून रशियन अधिकाऱ्यांनी दिली.

"वोल्खोव्ह नदीच्या किनारी, संध्याकाळी हे विद्यार्थी फेरफटका मारत होते. ही दुर्घटना अपघाती आणि अनपेक्षित होती. यामध्ये निशा भूपेश सोनवणे बचावली आहे. आता ती वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली आहे," अशी माहिती विद्यापीठाच्या एका अधिकाऱ्याने दिली. दुसरीकडे रशियामधील भारतीय दूतावास आणि सेंट पीटर्सबर्गमधील वाणिज्य दूतावास तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी आणि शक्य तितक्या लवकर भारतात परत आणण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांसोबत प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, वैद्यकीय पदवी शिक्षण मिळवण्यात भारतीय विद्यार्थ्यांसाठी रशिया हे लोकप्रिय ठिकाण बनले आहे. रशियात वैद्यकीय शिक्षणामध्ये उत्कृष्टतेचा मोठा इतिहास आहे. रशियामधील शिक्षण शुल्क आणि राहण्याचा खर्च खाजगी भारतीय महाविद्यालये किंवा तत्सम दर्जा असलेल्या इतर देशांपेक्षा लक्षणीयरीत्या कमी आहेत. 

टॅग्स :JalgaonजळगावAccidentअपघातrussiaरशियाdocterडॉक्टर