पालघर/बोईसर: तारापूर औद्योगिक वसाहतीमधील जखारिया कंपनी लिमिटेड या कपड्याचे उत्पादन करणाऱ्या कंपनीत शनिवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात कारखान्यातील एका कामगाराचा जागीच मुत्यू झाला असून एकजण बेपत्ता आहे, तर अन्य सहा कामगार जखमी झाले आहेत. (Six injured in a fire that broke out due to an explosion at Jakharia Fabric Ltd in Boisar, Maharashtra)
कारखान्यातील बॉयलरमुळे स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. स्फोटामुळे कारखान्याला लागलेल्या आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळविले असले तरी आग धुमसत आहे.
बोईसर औद्योगिक वसाहती मधील जखरिया टेक्स्टाईल या कारखान्यात शनिवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास बॉयलरचा स्फोट झाला आहे. स्फोटामुळे कारखान्याला आग लागली आहे. कारखान्यात आठ कामगार काम करीत होते.
स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. एका कामगाराचा मृतदेह कारखान्यात आढळून आला आहे, तर छोटेलाल सरोज नामक कामगार बेपत्ता आहे. सहा कामगार जखमी झाले आहेत, त्यांच्यावर बोईसर मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले.कारखान्यात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.स्फोटाच्या आवाजाने तीन ते चार किलोमीटरचा परिसर हादरला आहे.
कामगारांची नावे... १) मिथिलेश राजवंशी (मृत)२) छोटे लाल सरोज (बेपत्ता कामगार)३) गणेश विजय पाटील (जखमी) ४) अरविंद यादव (जखमी ) ५) मुरली गौतम (जखमी) ६) अमित यादव (जखमी)७) मुकेश यादव (जखमी) ८) उमेश राजवंशी (जखमी)