वावोशी : कंटेनरने हुलकावणी दिल्यामुळे दुचाकी डिव्हायडरवर आपटून झालेल्या अपघातात दोघे जखमी झाल्याची घटना मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्गावर घडली. गुरूवारी घाटकोपर मुंबई येथील संजयनगर झोपडपट्टीत राहणारे गुलाम रसूल बागवान (३६) आणि त्याचा चुलत भाऊ अस्लम रजा दुचाकीवरून पुण्याकडे जात होते. मुंबई - पुणे राष्ट्रीय महामार्गावरून जाताना संध्याकाळी पाठीमागून वेगात आलेल्या कंटेनरने हुलकावणी दिल्यामुळे गुलामचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. अपघातात अस्लम रजाच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून गुलाम किरकोळ जखमी झाला. त्यावेळी गस्तीवर असणारे दामिनी पथकातील पोलीस नाईक वैदेही सावंत आणि अर्पिता खैर तसेच बीट मार्शल नितीन गायकवाड व संदेश म्हात्रे यांनी तातडीने अपघातस्थळी पोहचून अपघातग्रस्तांना मदत केली. जखमींना लोधिवलीतील अंबानी रूग्णालयात दाखल केले आहे.
दोन अपघातांत चार जखमी
By admin | Published: April 29, 2016 3:50 AM